शहरात सोमवारपासून ‘या’ व्यक्तींचे लसीकरण सुरू करणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मे 2021 :- लसीचा तुटवडा असल्याने गेल्या दोन दिवसापासून बंद असलेले नगर शहरातील लसीकरण उद्या म्हणजेच सोमवारी सुरु होणार आहे. मात्र उद्या 45वर्षाच्या पुढे व्यक्ती ज्या फ्रंटलाईन मध्ये काम करत आहे.

अशांना दुसरा डोस उपलब्ध करून दिला जाणार असल्याची माहिती महानगरपालिकेच्या आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिल बोरगे यांनी दिली आहे.

आतापर्यंत नगर शहरांमध्ये 75 हजार लोकांना लसीकरण करण्यात आलेले आहे. कोवाक्सची व कोविशील असे दोन्ही प्रकारचे लसीचे डोस देण्यात आलेले आहेत. काहींचे दोन डोस पूर्ण झाले आहे तर काहींचे पहिले डोस दिलेला आहे.

नगर शहराची लोकसंख्या विचारात घेता सर्वांना लसीकरण केले पाहिजे हे जरी असले तरी दुसरीकडे डोस कमी प्रमाणामध्ये मिळत असल्यामुळे सध्या फक्त महानगरपालिकेच्या केंद्रामध्ये ते डोस दिले जात आहे.

येत्या काही दिवसांमध्ये जर साठा आम्हाला उपलब्ध झाला तर नगर शहरामध्ये आम्ही उपकेंद्र देण्यास सुरुवात करणार असल्याचे डॉक्टर बोरगे यांनी यावेळी सांगितले.

लसी संदर्भामध्ये केंद्र सरकारने दोन्ही लस च्या संदर्भामध्ये जे काही नियम व अटी घालून दिलेल्या आहेत त्याच पद्धतीने नागरिकांनी लसीकरण करून घ्यावे असेही डॉक्टर बोरगे यांनी म्हटले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24