नगर शहराचा पुढील चार दशकांचा पाणी प्रश्न मिटणार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 जून 2021 :- मी महापौर असताना केंद्र सरकारच्या माध्यमातून फेज २ पाणी योजना मंजूर करून आणली. शहरात विविध ठिकाणी पाण्याच्या टाक्या तयार केल्या.

मुळा धरणावरून पाणी उपसा करणाऱ्या अमृत पाणी योजनेचे कामही लवकरच मार्गी लागेल. नगर शहराचा पुढील चाळीस वर्षाचा पाणी प्रश्न मिटणार आहे, असे प्रतिपादन आमदार संग्राम जगताप यांनी केले. नागापूर बोल्हेगाव परिसराचा फेज २ पाणी योजनेचा शुभारंभ आमदार जगताप

यांच्या हस्ते झाला यावेळी महापौर बाबासाहेब वाकळे, नगरसेवक कुमारसिंह वाकळे, नगरसेवक डॉ. सागर बोरुडे,नगरसेवक ॲड. राजेश कतोरे, सरपंच दत्ता सप्रे, हनुमान कातोरे,.भीमसेन कोलते महाराज, राधाकिसन कातोरे, तुकाराम कातोरे महाराज,मोहन पडोळे, साहेबराव सप्रे,

रुपेश कळमकर, रुपेश वाकळे, नरेश पवार, सनी वाकळे, बाळू वाकळे, दत्तात्रय वाकळे, रंगनाथ वाटमोडे, नानाभाऊ वाटमोडे, ज्ञानदेव कापडे, आदिनाथ सप्रे, सुभाष कातोरे महाराज, राजू सप्रे आहे आदी यावेळी उपस्थित होते.

आमदार जगताप म्हणाले, शहराची फेज २ पाणी योजना अंतिम टप्प्यात आली आहे. काही भागाची फेज २ पाणी योजना सुरू केली आहे. यात आज नागापूर, बोल्हेगाव परिसरातील नागरिकांना फेज २ पाणी योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जाणार आहे.

नगरसेवक कुमार वाकळे यांनी याभागाचा पाणीप्रश्न सोडवण्यासाठी पाठपुरावा केल्यामुळेच पाण्याचा प्रश्न मार्गी लागला. नगरसेवक कुमारसिंह वाकळे म्हणाले, नागापूर-बोल्हेगाव परिसराचा पाणीप्रश्न अनेक वर्षापासून प्रलंबित होता,

हा प्रश्न सुटावा यासाठी महापालिका प्रशासन व आमदार जगताप यांच्याकडे पाठपुरवठा केल्यामुळे आज हा पाणी प्रश्न मार्गी लागला आहे.

बोल्हेगाव,नागापूर परिसराची लोकवस्ती विकास कामामुळे वाढत आहे. आता या फेस २ पाणी योजनेमुळे याभागाच्या विकासाला चालना मिळणार आहे.तसेच नागरिकांना पूर्ण दाबाने आता पाणीपुरवठा उपलब्ध होणार आहे, असे ते म्हणाले.

अहमदनगर लाईव्ह 24