नेप्ती उपबाजार येथे बंद झालेला कांदा बाजार पुन्हा सुरु

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 जून 2021 :- नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजार येथे कोरोनाच्या वाढत्या संसर्गामुळे बंद झालेला कांदा बाजार पुनः एकदा सुरू झाला आहे.

सुरु झाल्याच्या पहिल्याच दिवशी १९ हजार ७६० कांदा गोण्यांची आवक झाली. दरम्यान जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला होता.

त्यानुसार २५ मार्चपासून नगर बाजार समितीच्या नेप्ती उपबाजारात सुरू असणारा कांदा बाजार बंद करण्यात आला होता.

बाजार बंद असल्याने शेतकऱ्यांना कांदा साठवणुकीची मोठी अडचण निर्माण झाली होती. अवकाळी व मान्सून पूर्व पावसाने अनेक शेतकऱ्यांचा कांदा शेतातच भिजून खराब झाला.

यामुळे कांदा बाजार सुरू करण्याची शेतकऱ्यांची मागणी सुरू झाली होती. जिल्हाधिकारी यांच्या आदेशाने नेप्ती उपबाजार येथे एक महिन्यानंतर फळे व भाजीपाला बाजार खरेदी-विक्री सुरू करण्यात आली.

त्यानंतर काळ गुरुवार पासून नेप्ती उपबाजार समितीत सकाळी ७ ते ११ या वेळात कोविडच्या सर्व नियमांचे पालन करून कांदा लिलाव सुरू करण्याचे आदेश प्रशासनाने काढले.

त्यानुसार बाजार समितीने गुरुवारपासून कांदा लिलाव सुरू केले. कांद्याची आवक व मिळालेला भाव १९ हजार ७६० कांदा गोण्यांची म्हणजे जवळपास १० हजार ८६८ क्विंटल कांदा आवक झाली.

एक नंबरला १८०० ते २१०० रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. दोन नंबर १०५० ते १८०० रुपये. तीन नंबर ६०० ते १०५० रुपये. चार नंबर ३०० ते ६०० रुपये.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24