अहमदनगर Live24 टीम, 09 मार्च 2021:- कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शाळा, कॉलेज बंद ठेवण्यात आले होते. दरम्यान गेल्या काही दिवसांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्याने कॉलेज सुरु करण्यात आले आहे. यातच अकोले तालुक्यातील एका कॉलेजमधून एक मोठी बातमी समोर येत आहे.
तालुक्यातील एका कॉलेजच्या आयटी लॅबला आज मंगळवारी पहाटेच्या सुमारास आग लागल्याने लॅबचे मोठे आर्थिक नुकसान झाले. या अकोले महाविद्यालयाच्या आयटी लॅबमध्ये असणारे ६० संगणक, सर्व्हर, लॅपटॉप, प्रिंटर, फर्निचर, इन्व्हर्टर, बॅटरी, इलेक्ट्रॉनिक साहित्य, विभाग प्रमुख कार्यालयातील महत्वाची कागदपत्रे आदी जळून खाक झाले आहे.
या आगीत सुमारे ६२ लाख रुपयांचे आर्थिक नुकसान झाले असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. सुदैवाने या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली तरी मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. याबाबत अधिक माहिती अशी कि, ‘आयटीआय’वर फिरण्यासाठी येणाऱ्या शेळके नावाच्या व्यक्तीने सर्वप्रथम ही आग लागल्याचे पाहिले.
त्यानंतर महाविद्यालय प्रशासनाला ही माहिती समजली. त्यानंतर अगस्ति कारखान्याच्या अग्निशमन बंबला पाचारण करण्यात आले मात्र तोपर्यंत आगीत सर्व काही जाळून भस्मसात झाले.