अहमदनगर Live24 टीम, 16 एप्रिल 2021 :-कोरोनाच्या काळात गंभीर रुग्णांसाठी रेमडेसिवीर लस खूप मोठी संजीवनी ठरत आहे. मात्र ही इंजेक्शनची मागणी प्रचंड असल्याने केवळ राज्यातच नव्हे तर देशात रेमडेसिवीर लसीचा तुटवडा निर्माण झाला आहे.
रेमडेसिवीर इंजेक्शन बनवणारी एक मोठी कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद असल्याने खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे राज्याला एकाही नव्या रेमडेसिवीर लसीचा पुरवठा झाला नाही.
देशात रेमडेसिवीर लस बनवणाऱ्या सात कंपन्या आहेत. हेट्रो ड्रग्ज, झायडस कॅडिला, सिप्ला, डॉ. रेड्डीज, व्हायट्रिस, बायोकॉनची उपकंपनी सिंजीन इंटरनॅशनल आणि ज्युबिलंट फार्मोव्हा या सात कंपन्या रेमडेसिवीर इंजेक्शन बनवतात.
यापैकी एक मोठी कंपनी असलेली हैदराबादची हेट्रो फार्मा ही कंपनी गेल्या दोन दिवसांपासून बंद आहे. यामुळे लसीचा मोठी गरज असतानाही कंपनी बंद राहिल्याने याचा फटका लसीच्या पुरवठ्यावर झाला आहे. या कंपनीचा हैदराबादचा प्लँट बंद आहे.
ही एकटी कंपनी दररोज ३२ हजार लसी तयार करते. गेले दोन दिवस सुट्टी असल्याने या कंपनीचे उत्पादन ठप्प झाले होते.
अन्य सहा कंपन्या दिवसाला ३० हजार इंजेक्शन बनवतात. या कंपन्यांकडून देखील महाराष्ट्राला पुरवठा होतो. मात्र गुरुवारी दिवसभरात एकही रेमडेसिवीर इंजेक्शन महाराष्ट्राला मिळाले नाही.