‘आधीच होतं थोडं त्यात व्याह्याने धाडलं घोडं’ अशी झालीय नगरकरांची अवस्था!

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 ऑगस्ट 2021 :-  कोरोनामुळे नागरिकांचे कंबरडे मोडले असून, अनेक व्यवसाय बंद पडले आहेत. कोरोनाच्या संकटातून सावरत नाहीत तोच परत गढूळ पाण्यामुळे जलजन्य आजाराचा धोका असतो.

त्यामुळे नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन महापालिकेने केले आहे.’आधीच होतं थोडं त्यात व्याह्याने धाडलं घोडं’ अशी झालीय नागरकरांची अवस्था झाली आहे.

केंद्रशासित अमृत अभियान योजनेचे काम प्रगतीपथावर असून त्या अंतर्गत विळद जलशुद्धीकरण केंद्र येथे नवीन जलशुद्धीकरण केंद्र येथून उपलब्ध होणार्‍या पाण्यामध्ये जलशुद्धीकरण प्रक्रिये शिवाय काही प्रमाणात मिसळले जात आहे.

त्यादृष्टीने विळद जलशुद्धीकरण प्रकल्प व वसंत टेकडी जलकुंठ येथे तुरटी व क्लोरीनची मात्रा वाढवण्यात आलेली आहे. या कामामुळे नागरिकांना काही प्रमाणात गढूळ पाण्याचा पुरवठा होण्याची शक्यता आहे.

पावसाळ्याच्या दिवसात जलजन्य आजाराची शक्यता लक्षात घेता शहरातील सर्व नागरिकांनी पाणी उकळून व गाळून प्यावे असे आवाहन करण्यात आले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24