‘त्या’ रस्त्याच्या दुरुस्तीबाबत अखेर बांधकाम विभागाला आली जाग

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टीम, 18 सप्टेंबर 2021 :- सार्वजनिक बांधकाम विभागाने संगमनेर – अकोले रस्त्याला पडलेले खड्डे बुजविण्याच्या कामाला सुरूवात केली आहे. दरम्यान या रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत.

यामुळे वारंवार या परिसरात अपघात घडत असतात. या अपघातात अनेकांना प्राण देखील गमवावा लागतो आहे. मात्र अखेर बांधकाम विभागाला जाग आली असून हे खड्डे दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हे सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री असताना त्यांनी ३ मार्च २०१९ रोजी संगमनेरात घाटघर – संगमनेर या महत्त्वपूर्ण रस्त्यासह बारी-राजूर-कोतुळ व रंधा-भंडारदरा-वारंघुशी या ८४ किलोमीटर लांबीच्या १६८ कोटी रुपये खर्च करून बांधण्यात येणाऱ्या रस्त्यांच्या कामाचे भूमिपूजन केले होते.

मात्र, अडीच वर्ष पूर्ण होऊनदेखील संगमनेर – अकोले रस्त्याचे काम अद्यापही अपूर्ण आहे. म्हाळुंगी नदीवरील संगमनेर शहर परिसरातील अकोले नाक्यावरील पुलाच्या सुशोभिकरणाचे काम सध्या सुरू आहे.

हे काम सुरू असताना, संगमनेर-अकोले रस्त्यावर अनेक ठिकाणी लांबच लांब खड्डे पडले आहेत. हे खड्डे बुजविण्याचे काम सुरू करण्यात आले आहे.

Ahmednagarlive24 Office