‘ही’ वादग्रस्त अभिनेत्री म्हणाली 2024 ला मोदीच पंतप्रधान बनतील

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 10 मार्च 2021:- कंगना रानौत नाव ऐकले कि काहीनाकाही वादग्रस्त मुद्दा लगेच डोळ्यासमोर येतो.

गेल्या काही दिवसांपूर्वी ठाकरे सरकारवर निशाणा साधत प्रसिद्धी झोतात आलेली कंगना आता पुन्हा एका नव्या वक्तव्यामुळे चर्चेत आहे.

कंगनाने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या समर्थनार्थ एक ट्विट केले आहे. यामध्ये तिने मोदींवर स्तुतीसुमने उधळली आहे. कंगना नेहमीच भाजप सरकारआणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे समर्थन करताना दिसते.

ती म्हणाली सस्पेंड होण्याच्या किमतीवर मी जाहिरपणे सांगते की २०२४ ला मोदीच पुन्हा पंतप्रधान बनतील” अशा आशयाचे ट्विट कंगनाने केलं आहे. २०१४ मध्ये निवडणूक जिंकत नरेंद्र मोदी पहिलांदा पंतप्रधान झाले.

त्यानंतर २०१९ मध्ये पुन्हा एकदा भाजपची सत्ता आली आणि मोदींचं पंतप्रधान पद कायम राहिलं. यावरूनच कंगनाने हे ट्विट करत २०२४ मध्ये ही नरेंद्र मोदी निवडणूक जिंकत पंतप्रधान असतील असं म्हटलं आहे.

भारत जगातील सर्वात वेगाने विकसित होणारी अर्थव्यवस्था असल्याचे सुचविणार्‍या अहवालाच्या आधारे कंगनाने एक ट्विट केले आहे. तिच्या या ट्विटने सगळ्यांचे लक्ष वेधले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24