अहमदनगर Live24 टीम, 18 जून 2021 :- कोरोना देशातून अजून संपलेला नाही. तो सातत्याने आपले रंग बदलत आहे. त्यामुळे आपण स्मार्ट आणि सतर्क राहायला हवं.
लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवे असा इशारा AIIMS अर्थात All India Institute of Medical Science चे अध्यक्ष डॉ. नवनीत विग यांनी दिला आहे. देशात कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना अनलॉकची प्रक्रिया अनेक राज्यांनी सुरू केली आहे.
मात्र या पार्श्वभूमीवर नागरिकांनी पुन्हा एकदा घराबाहेर पडताना नियमांना तिलांजली दिल्याचं दिसून येत आहे. अनेक ठिकाणी कोरोनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दी केली जात आहे. या पार्श्वभूमीवर डॉ. विग यांनी कोरोनाचे नियम मोडणाऱ्या नागरिकांना इशारा हा दिला आहे.
डॉक्टर विग म्हणाले, कोरोनाची लाट ओसरू लागल्यानंतर देशात अनेक ठिकाणी अनलॉकची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मात्र, नागरिकांनी गर्दी केल्याचं अनेक ठिकाणी दिसत आहे. डॉ. विंग म्हणाले, कोरोना देशातून अजून संपलेला नाही. तो सातत्याने आपले रंग बदलत आहे.
त्यामुळे आपण स्मार्ट आणि सतर्क राहायला हवं. लोकांनी स्वच्छ मास्क घालायला हवेत. लवकरात लवकर लसीकरण करून घ्यावं आणि कोरोनाच्या नियमांचं पालन करावं. दरम्यान, डॉ. विग यांनी कोरोनाच्या परिस्थितीविषयी सवाल उपस्थित केला आहे.
जर कोरोनाची तिसरी लाट आली, तर आपण कुणाला दोषी धरणार आहोत? आपल्याला प्रत्येक जिल्ह्याचा पॉझिटिव्हिटी रेट १ टक्क्यांपेक्षा कमी ठेवण्याच्या दृष्टीने आपलं धोरण आणि प्रयत्न करायला हवेत. शिवाय, प्रत्येक जिल्ह्यात किमान ५० टक्के ऑक्सिजन बेड रिकामे असायला हवेत, असं ते म्हणाले.