अहमदनगर Live24 टीम, 21 फेब्रुवारी 2021:-वर्षापासून कोरोनाचे संकट आहे. राज्यात कोरोना रोखण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने चांगले काम केले. नागरिकांचेही सहकार्य लाभले. मात्र, लॉकडाऊन शिथिलतेनंतर झालेल्या निष्काळजीमुळे पुन्हा कोरोना धोका वाढत आहे.
कोरोना संपलेला नाही, प्रत्येकाने नियम व मास्क वापरून काळजी घ्यावी, असे आवाहन महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी केले. मंत्री थोरात म्हणाले, कोरोना मानवावरील मोठे संकट आहे.
वर्षापासून जग हतबल आहे. राज्यात कोरोना रोखण्यात यश आले. आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेतली. कोरोना लस उपलब्ध झाली, हे मोठे यश आहे. मात्र निष्काळजीपणा, वाढणारी गर्दी चिंतेचा विषय ठरली.
सध्या काही शहरात कोरोना वाढतो आहे. यासाठी शासन नियमांचे पालन करणे अत्यंत गरजेचे आहे. मास्कचा वापर, फिजिकल डिस्टन, हात स्वच्छ धुणे या त्रिसूत्रीचा वापर पादुर्भाव रोखण्यासाठी महत्वाचा ठरणारा आहे.
महाविकास आघाडीच्या माझे कुटुंब, माझी जबाबदारी या योजनेतंर्गत राज्यातील कोरोना रोखण्यात यश मिळाले. कोरोना रोखण्यासाठी स्वयंशिस्त महत्त्वाची आहे. विनाकारण घराबाहेर पडणे टाळा. गर्दी करू नका. घरगुती समारंभ टाळावेत.