अहमदनगर Live24 टीम, 6 एप्रिल 2021 :-खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी माझी असा शब्द जिल्हाधिकारी डॉ राजेंद्र भोसले यांनी दिला होता.
त्यामुळे आपण दिलेला शब्द पाळा तसेच वाढीव बिलांची रक्कम परत मिळवून देण्याची जबाबदारी आपलीच आहे.
त्यातुन तुम्ही पळ काढू नका खाजगी हॉस्पिटल च्या डॉक्टरांना पाठीशी घालू नका. याबाबतचे निवदेन मनसेने जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहे.खाजगी हॉस्पिटल मधील कोरोना आजारावर उपचार घेतलेल्या रुग्णाची वाढीव बिलांची रक्कम परत मिळावी तसेच
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत खाजगी हॉस्पिटल शासन नियम डावलत असुन कुठल्याही प्रकारे शासन नियम दराप्रमाणे बिले दिली गेली जात नसल्यामुळें रुग्णांना पुन्हा लाखों रुपयांची बिले हे सर्व सामान्य जनतेला भरावी लागत असल्यामुळे
मनसेच्या वतीने नितीन भुतारे यांनी जिल्हाधिकारी व महानगर पालिका आयुक्तांना निवेदन दिले. निवेदनात म्हंटले आहे कि,
खाजगी हॉस्पिटल मधील वाढीव बिलांची तपासणी तसेच मागील वाढीव बिलांची रक्कम परत देण्याबाबचा निर्णप्रक्रियेत महानगरपालिका आयुक्त पाहतील त्यांच्या अधिकाऱ्यानं मार्फत या पुढे चौकशी करून कारवाई केली जाईल.
असे सांगितले.त्यामुळे मनसेच्या वतीन जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देऊन २३ जानेवारी २०२१ च्या जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जिल्हाधिकारी साहेबांनी दिलेल्या शब्दाची आठवण करून दिली.
महानगर पालिका ही भ्रष्टाचार करणारी मोठी कंपनी आहे त्यामुळे त्यांच्यावर आमचा विश्वास नाही.
आजही खाजगी हॉस्पिटलची वाढीव बिलांची तक्रार आमच्याकडे येत आहे परंतू महानगरपालिकेचे यावर कुठलेही नियंत्रण नाही सरकारी बेड फुल झाल्यामुळे खाजगी हॉस्पिटल मध्ये सर्वसामान्यांना उपचार करावे लागत आहे.