मनपाने तीन महिन्याची घरपट्टी रद्द करावी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 24 मे 2021 :- सध्या राज्यासह नगर शहरात मार्च, एप्रिल व मे महिन्यापासून कोरोनाने थैमान मांडले आहे. त्यामुळे अनेक दिवसापासून नगर शहरात लॉकडाऊन करण्यात आले आहे.

सर्वत्र कामधंदा व व्यापार, छोटे मोठे व्यवसाय ठप्प आहेत. अशा परिस्थितीत अहमदनगर महानगरपालिकेने एप्रिल, मे, जून या तीन महिन्याची घरपट्टी रद्द करण्यात यावी,

अशी मागणी शिवसेनेचे माजी शहरप्रमुख संभाजी कदम यांनी मनपा आयुक्तांकडे निवेदनाद्वारे केली आहे.यामध्ये फक्त घरगुती नव्हे तर व्यवसायिक यांचाही घरपटीसह विविध टॅक्स रद्द करण्यात यावे,

असे म्हटले असून हे रद्द केल्याने एक प्रकारे नागरिकांना दिलासा देण्याचे कामही होईल अशी मागणी श्री.कदम यांनी केली आहे

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24