अहमदनगर Live24 टीम, 25 जून 2021 :- जिल्हा असो वा गाव राजकारण म्हंटले कि सत्ताधारी आणि विरोधक आमने – सामने येत एकमेकांची जिरविण्याची एकही संधी सोडत नाही.
त्यांच्या या डावपेचात शहराची विकासकामे रोखली जातात असाच काहीसा प्रकार कोपरगावात सुरु असल्याचे दिसून येत आहे.
कोपरगाव शहराचा जाणीवपूर्वक विकास होवू द्यायचा नाही या उद्देशातून सर्व प्रकारचे निर्णय होऊनसुद्धा वारंवार विकासकामात अडथळे आणले जात आहेत.
याबाबत कोपरगावचे नगराध्यक्ष विजयराव वहाडणे म्हणाले कि, आजवर शहराच्या विकासासाठी राष्ट्रवादीच्या सर्व नगरसेवकांनी सहकार्याची भूमिका घेतली आहे.
शिवसेनेचे काही नगरसेवक अपक्ष नगरसेवक व जनता माझ्यासोबत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात विकासकामे केली आहेत.
मात्र कोल्हे गटाचे काही नगरसेवक सातत्याने विकासकामात अडथळे आणीत असल्यामुळे विकासकामे सुरू होण्यात विलंब होत आहे.
त्याचा त्रास शहरातील नागरिकांना होत आहे. पोरकट नेत्याचे आदेश मानू नका. शहराच्या विकासाला हातभार लावा, असे आवाहन यांनी कोल्हे गटाच्या नगरसेवकांना केले आहे.
आमदार आशुतोष काळे यांच्या अथक प्रयत्नातून शहरविकासासाठी निधी आणला आहे.त्यामुळे सर्व सत्ताधारी नगरसेवकांनी विकासकामात राजकारण न आणता जनतेचे हित लक्षात घेऊन विकासकामांना सहकार्य करावे.