अहमदनगर Live24 टीम, 4 एप्रिल 2021 :-गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी स्तर गाठला होता.
विक्रमी स्तरावर पोहोचल्यानंतर सोन्याच्या किंमतीत घट आणि आयात शुल्कातही कपात झाल्याने ग्राहक आणि सराफांचा कल सोन्याकडे वाढत आहे.जानेवारी ते मार्चच्या तीन महिन्याच्या दरम्यान सोन्याची आयात 321 टन इतकी होती.
जी वर्षभरापूर्वी फक्त 124 टन होती. किंमतीच्या आधारावर मार्चमध्ये ही आयात वर्षभरापूर्वीच्या 1.23 अब्ज डॉलरच्या तुलनेत 8.4 अब्ज डॉलर इतकी झाली आहे. गेल्यावर्षीच्या ऑगस्ट महिन्यात सोन्याच्या किंमतीने 56200 रुपये प्रति 10 ग्रॅमचा विक्रमी स्तर गाठला होता.
मात्र यानंतर सोन्याच्या किंमती सातत्याने खाली येत आहेत आणि आत्तापर्यंत यात साधारण 22 टक्क्यांची घट झाली आहे. गेल्या महिन्यात सोन्याचा घरगुती भाव एका वर्षातील निचांकी स्तरावर म्हणजेच 43,320 रुपये प्रति 10 ग्रॅमवर आला होता.
फेब्रुवारीमध्ये सरकारने सोन्यावरील आयात शुल्क 12.5 टक्क्यांवरून कमी करून 10.75 टक्के केल्याची घोषणा केली होती.
स्थानिक मागणी वाढवण्यासाठी आणि तस्करीवर लगाम लावण्यासाठी ही पावले उचललेली होती. मात्र सोन्याची आयात वाढवल्याने देशाचा व्यापार कमी होऊ शकतो. सोबतच रुपयाच्या आंतरराष्ट्रीय मूल्यावरही दबाव येण्याची शक्यता आहे.