Gujrat Election : देशाचे गुजरात निवडणुकीकडे लक्ष ! पहिल्या टप्प्यात ८९ जागांसाठी मतदान सुरू; ७८८ उमेदवारांचे भवितव्य पणाला

Gujrat Election : देशातील २०२४ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी गुजरात विधानसभा निवडणूक महत्वाची मानली जात आहे. कारण येणाऱ्या लोकसभेसाठी ही निवडणूक भाजप आणि इतर पक्षांसाठी खूप महत्वाची आहे. आज गुजरातमध्ये ८९ जागांसाठी मतदान सुरू झाले आहे.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यासाठी ८९ जागांवर मतदान सुरू आहे. सौराष्ट्र-कच्छ आणि राज्याच्या दक्षिणेकडील 19 जिल्ह्यांतील 89 जागांवर आज मतदान होत आहे. एकूण 788 उमेदवार रिंगणात आहेत.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

गुरुवारी 14 हजार 382 मतदान केंद्रांवर सकाळी 8 ते सायंकाळी 5 या वेळेत मतदान होणार आहे. प्रमुख उमेदवारांमध्ये गुजरातचे मुख्यमंत्री भूपेंद्र पटेल घाटलोडियामधून निवडणूक लढवत आहेत.

आम आदमी पार्टीचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार इसुदान गढवी खंभलियातून, माजी काँग्रेस नेते आणि विरमगाममधून भाजपचे उमेदवार हार्दिक पटेल आणि जामनगर (उत्तर)मधून क्रिकेटपटू रवींद्र जडेजाच्या पत्नी रिवाबा जडेजा.

गुजरातचे अर्थमंत्री कनुभाई देसाई म्हणाले की, गुजरात प्रगती करत असून राज्यातील जनतेने भाजपला मतदान करण्याचा निर्णय घेतला आहे. भाजपवर जनतेचा विश्वास असून राज्यात यापुढेही विकास होईल. राज्यात भाजप सरकार स्थापन करणार आहे.

पंतप्रधान मोदींचे प्रथम मतदारांना उत्साहाने मतदान करण्याचे आवाहन

पहिल्या टप्प्यातील मतदानात प्रथमच मतदान करणाऱ्यांना मतदान करण्याचे आवाहन पंतप्रधान मोदींनी केले. मोदींनी ट्विटमध्ये म्हटले आहे की, “आज गुजरात निवडणुकीचा पहिला टप्पा आहे. आज मतदान करणाऱ्या प्रत्येकाला, विशेषत: पहिल्यांदा मतदान करणाऱ्यांना मी विक्रमी संख्येने मतदान करण्याचे आवाहन करतो.