एक रुग्ण आढळल्याने या देशाची राजधानी सात दिवसांसाठी लॉकडाऊन

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 13 ऑगस्ट 2021 :-  ऑस्ट्रेलियाची राजधानी कॅनबरामध्ये बुधवारी वर्षभरानंतर कोरोनाचा एक रुग्ण आढळून आला. त्यामुळे ४.३० लाख लोकसंख्येच्या शहरात सात दिवसांसाठी कडक लॉकडाऊन लागू झाला.

या प्रांताचे प्रमुख अँड्रयू ब्रार म्हणाले, रुग्णाला निगराणीखाली ठेवण्यात आले आहे. त्याच्या संपर्कात आलेल्या २० जणांची तपासणी करण्यात आली आहे. सोबतच काही लोकांची ट्रेसिंग केली जात आहे. लॉकडाऊनची घोषणात होताच राजधानीत गोंधळाची स्थिती दिसून आली.

बाजारपेठ तसेच मॉलमध्ये खरेदीसाठी झुंबड उडाली होती. कॅनबरामध्ये रुग्ण संख्येत वाढ होऊ शकते, असा लोकांचा अंदाज आहे. त्यामुळे लॉकडाऊनचा कालावधी वाढवला जाऊ शकतो.

म्हणूनच गरजेच्या वस्तूंची खरेदी केली जात आहे. बुधवारी सायंकाळपर्यंत दुकाने जणू रिकामी झाली होती. अनेकांना रिकाम्या हातांनी घरी परतावे लागले.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24