व्यावसायिकाकडे काम करणाऱ्या दाम्पत्याने मालकाला लाखोंना गंडवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 17 जून 2021 :- जिस घर मे खाया पिया उसी मे छेद… या म्हणीला साजेसे अशीच एका घटना नगर शहरात घडली आहे. यामुळे एकच खळबळ उडाली आहे.

नगर शहरातील एका व्यवसायिकाकडे कामगार म्हणून असणार्‍या पती- पत्नीने घरातून अडीच वर्षामध्ये सहा लाख 37 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली आहे. दरम्यान या दाम्पत्याविरुद्ध शहरातील कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

याप्रकरणी शहरातील व्यवसायिक हरिषचंद्र कृष्णाजी मते (वय 71 रा. डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रोड) यांनी फिर्याद दिली आहे. दाखल फिर्यादीवरून गणेश पंडीत साळवे, सरला गणेश साळवे (दोघे रा. डॉक्टर कॉलनी, बुरूडगाव रोड, नगर) या दोघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, फिर्यादी यांचा गॅस व्यवसाय आहे. त्यांच्याकडे साळवे दांपत्य कामाला होते. 4 सप्टेंबर 2018 ते 25 मे 2021 या कालावधीत साळवे दांपत्यांनी फिर्यादी यांच्या घरातून संगणमताने सहा लाख 37 हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेली. 25 मे रोजी ही घटना उघडकीस आली.

यानंतर काल (बुधवार) कोतवाली पोलीस ठाण्यात साळवे दांपत्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनास्थळी शहर उपअधीक्षक विशाल ढुमे, सहायक निरीक्षक हेमंत भंगाळे यांनी भेट दिली असून पुढील तपास पोलीस हवालदार देवराम ढगे करीत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24