अहमदनगर Live24 टीम, 24 फेब्रुवारी 2021 :-पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयाचे मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याविरुद्ध राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याच्या आरोपाखाली याचिका दाखल करण्यात आली होती.
मात्र ही याचिका औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी कि, नगर तालुक्यातील पिंपळगाव माळवी येथील श्रीराम विद्यालयात स्वातंत्र्यदिनानिमित्त (ऑगस्ट 2014) राष्ट्रध्वजाची रांगोळी काढण्यात आली होती.
ध्वजवंदनानंतर विद्यार्थी आणि ग्रामस्थांकडून ती पुसली गेली. त्यामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान झाल्याबाबतची फिर्याद नानासाहेब झिने यांनी नगर येथील प्रथमवर्ग न्यायालयात दाखल केली होती.
तत्कालीन मुख्याध्यापक ज्ञानदेव खराडे आणि संस्थाचालक जे. के. बारगळ यांना यात आरोपी करण्यात आले होते.
ही फौजदारी प्रक्रिया रद्द करावी, अशी याचिका खराडे व बारगळ यांनी खंडपीठात दाखल केली होती.
याचिकाकर्त्यांच्या वतीने ऍड. एन. बी. नरवडे यांनी केलेला युक्तिवाद न्यायालयात ग्राह्य धरण्यात आला.
दरम्यान मुख्याध्यापक आणि संस्थाचालक यांच्याविरुद्ध नगर येथील प्रथमवर्ग न्यायालयाने सुरू केलेली फौजदारी प्रक्रिया औरंगाबाद खंडपीठाने रद्द केली आहे.