अहमदनगर Live24 टीम, 02 मार्च 2021:- राहाता तालुक्यातील बाभळेश्वर येथील एका शेतकऱ्याचा दोन एकर ऊस शॉटसर्किटने जाळून खाक झाला असल्याची घटना नुकतीच घडली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, बाभळेश्वर सबस्टेशनच्या मागील बाजूस शेतकरी तुषार संजय म्हस्के व अभिषेक राजेंद्र म्हस्के यांचे शेत आहे. याठिकाणी त्यांच्या शेतात मोठ्या प्रमाणात टॉवर्स लाईन गेल्या आहेत.
तसेच याठिकाणी शेती लाईन सुद्धा आहे. याठिकाणी टॉवर्स लाईनच्या आगीच्या लोळामुळे या उसाला आग लागली. परिसरातील नागरिकांनी विखे कारखान्याच्या अग्निशामक दलास फोन केला.
तोपर्यंत नागरिकांनी आग विझविण्यासाठी प्रयत्न केला. अग्निशमन आल्यानंतर आग आटोक्यात आणली. यात मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. बराच ऊस यात जळाला.
तसेच या बरोबर ठिबक सिंचन सहीत सर्व साहित्य जळून गेले. यात सुमारे तीन लाखांचे नुकसान झाले. आगीच्या घटेनचे रूप पाहता महावितरणने झोळ असणार्या ठिकाणी दुरूस्ती करून घ्यावी. म्हणजे अशा घटना होणार नाहीत. या घटनेचा तलाठ्याने पंचनामा केला आहे.