Sanjay Raut : “बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचं कधी भलं झालं नाही”

Sanjay Raut : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर सडकून टीका केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा उद्या स्मृतिदिन आहे. त्यानिमित्ताने एकनाथ शिंदे यांच्याकडून शिवाजी पार्कमध्ये जाऊन अभिवादन करण्यात येणार आहे.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

शिंदे आणि ठाकरे गट आमनेसामने येऊ नयेत म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आजच बाळासाहेबांच्या स्मृतिस्थळी जाऊन अभिवादन करण्याचा निर्णय घेतला आहे.

ठाकरे परिवार उद्या शिवाजी पार्क येथील बाळासाहेबांच्या स्मृतीला अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत. मुख्यमंत्री आज अभिवादन करण्यासाठी जाणार आहेत त्यावरून संजय राऊत यांनी टीका केली आहे.

Advertisement

संजय राऊत म्हणाले, ज्यांना बाळासाहेबांना अभिवादन करायचे त्यांना करू द्या. बाळासाहेब ठाकरे देशाचे आणि विश्वाचे आहेत. फक्त आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा आणि मग स्मारकाला हात जोडायला जा. तरच बाळासाहेबांचे आशीर्वाद घ्या असा टोला त्यांनी शिंदेंना लगावला आहे.

पुढे बोलताना राऊत म्हणाले, आपल्या हातातील खंजीर बाजूला ठेवा. कोणीही असतील. त्यांनी हातातील खंजीर बाजूला ठेवूनच बाळासाहेबांना अभिवादन करावं. मी व्यक्तिगत नाव घेत नाही. बाळासाहेब ही एक अशी आत्मा आहे ते सर्व पाहात आहेत.

बाळासाहेबांच्या पाठीत जे खंजीर खुपसतात त्यांचे कधी भलं झाले नाही. हा इतिहास आहे. सर्वजण स्मृतीस्थळावर जाऊ शकतात पण चांगल्या मानाने जा, अशी टीकाही संजय राऊत यांनी केली आहे.

Advertisement