अहमदनगर Live24 टीम, 16 मार्च 2021:- कोरोना पुन्हा फोफावू लागल्याने प्रशासन अलर्ट झाले आहे. यामुळे नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर प्रशासन कारवाई देखील करत आहे.
यातच एक लग्नसोहळा सध्या चर्चेचा विषय बनला आहे. लग्नातील डान्स नवरदेवाच्या वडिलांना चांगलाच भोवला आहे. याप्रकरणी पोलिसांनी नवरदेवाच्या वडिलांवर गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, नगर तालुक्यातील चास शिवारात चास ते अकोळनेर जाणारे रोडवर लक्ष्मण नामदेव कार्ले याचे मुलाचे लग्नाच्या वरातीमध्ये मंगेश अरुण थोरात (रा पाईपलाईन रोड ता. जि अहमदनगर) याचा
साउंड सिस्टिम बुक करून थोरात यांनी टाटा कंपनीची निळ्या रंगाची ७०९ टेम्पो ( एमएच १६बी ३३४८) यामध्ये बसविण्यात आलेल्या साउंड सिस्टिमवर गाणे वाजविण्यात येऊन, यावेळी वरतीसाठी आलेले लोक हे विनामास्क गर्दी करून नाचत होते.
या दरम्यान, जिल्हाधिकारी यांनी कोविड १९ या रोगाचे प्रादुर्भाव संदर्भाने निर्गमित केलेल्या आदेशाचे संबंधितांनी उल्लंघन केले. याबाबत पोकॉ संदीप जाधव यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण नामदेव कार्ले,
मंगेश अरुण थोरात या दोघांवर नगर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान टाटा कंपनीची निळ्या रंगाची ७०९ टेम्पो (एमएच १६बी ३३४८) त्याचे मुळ रचनेत बदल केलेला,
हायलेक्स प्रो लाईट कंपनीचे मिक्सर किं, किर्लोस्कर कंपनी चे जनरेटर, काळे रंगाचे चार बेस टॉप असा एकूण ४ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत केला आहे. जिल्ह्यात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढला आहे. यामुळे प्रशासनाने पुन्हा एकदा नियम कडक केले आहे.
यामुळे अनेक सार्वजनिक कार्यक्रमासह, घरगुती संभारंभावर देखील बंधने घालण्यात आली आहे. यातच लग्न सोहळ्यातील गर्दीमुळे तर कोरोनाचा धोका वाढला आहे. याच अनुषंगाने पोलिसांकडून कारवाई सुरु आहेत.