धोका वाढला..देशात कोरोनाची दुसरी लाट अजूनही संपलेली नाही

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- देशातील १८ जिल्ह्यांमध्ये गेल्या ४ आठवड्यांपासून कोरोना रुग्णांच्या संख्येत सातत्यानं वाढ होत असल्याचं दिसून आल्याचं आरोग्य मंत्रालयानं सांगितलं.

या १८ जिल्ह्यांमध्ये देशातील एकूण रुग्णांपैकी ४७.५ टक्के रुग्ण आहेत. केरळमधील १० जिल्ह्यांमध्ये गेल्या एका आठवड्यात ४०.६ टक्के कोरोना रुग्ण आढळले आहेत.

देशात कोरोनाचा प्रादुर्भाव हळूहळू कमी होत असताना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं मंगळवारी पत्रकार परिषद घेत एक महत्वाची माहिती दिली आहे. देशातील एका राज्यात सध्या १ लाखाहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत.

तर ८ राज्य अशी आहेत की जिथं सध्या १० हजाराहून अधिक सक्रीय रुग्ण आहेत. तर २७ राज्यांमध्ये १० हजारापेक्षा कमी सक्रीय रुग्ण आहेत, अशी माहिती केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे संयुक्त सचिव लव अग्रवाल यांनी दिली.

देशात सध्या ४४ जिल्ह्यांमध्ये कोरोना रुग्णवाढीचा दर १० टक्क्यांहून अधिक असल्याचंही अग्रवाल यांनी सांगितलं. हे जिल्हे केरळ, मणिपूर, मिझोराम आणि नागालँडमध्ये आहेत. जगभरात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24