अहमदनगर Live24 टीम, 17 सप्टेंबर 2021 :- आयकर पोर्टलमधील तांत्रिक त्रुटींमुळे तुम्ही या वर्षासाठी (FY 2020-21) 31 डिसेंबरपर्यंत तुमचे आयकर विवरणपत्र दाखल करू शकता. पोर्टलमधील वारंवार त्रुटींमुळे सरकारने ही मुदत दिली.

अशा परिस्थितीत जरी तुम्ही 31 डिसेंबरपर्यंत तुमचे रिटर्न भरले, पण जर कर जमा केला नाही, तर तुम्हाला दंड भरावा लागेल.

तोही दर महिन्याला पूर्ण 1 टक्के आधारावर असेल. हा दंड केवळ तेव्हाच लागू होईल जेव्हा तुमच्यावरील आयकर दायित्व 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असेल.

आयकर आणि दंडाची जबाबदारी दोन प्रकारे निश्चित केली जाणार:-  यासंदर्भात सीए प्रवीण अग्रवाल यांचे म्हणणे आहे की, आयकर दायित्व दोन प्रकारे ठरवले जाईल. वैयक्तिक व्यवसाय श्रेणीमध्ये प्रथम येणारे आहे. दुसरे म्हणजे, ते लोक जे एका कंपनीत काम करत आहेत आणि ज्यांचे कर ऑडिट केले जातात.

पूर्वीच्या प्रकरणात थकीत कर जमा करण्याची अंतिम मुदत 31 जुलै आहे. तर दुसऱ्या प्रकरणात 31 ऑक्टोबर ही आहे. दोन्ही प्रकरणांमध्ये प्रलंबित कराची रक्कम 1 लाख रुपयांपेक्षा जास्त असावी.

दंड कोणासाठी आणि किती :- इन्कम टॅक्स रिटर्न किंवा प्राप्तिकर विवरणपत्र भरणे आणि कर भरणे या दोन वेगवेगळ्या बाबी आहेत. इन्कम टॅक्सच्या कलम २३४अ अंतर्गत कर जमा करण्याच्या मुदतीत जमा न केल्यास तुमच्यावर दरमहिन्याला १ टक्के दंड आकारला जातो. जितक्या रकमेचा कर भरणे बाकी तितक्याच रकमेवर हा दंड आकारला जातो.

ही बाब एका उदाहरणाने समजून घेऊया. समजा अनिल नावाच्या व्यक्तीचे वार्षिक पॅकेज २५ लाख रुपये आहे. पॅकेज जास्त असल्यामुळे साहजिक प्राप्तिकर भरावा लागेल.

समजा अनिलने करबचतीसाठी गुंतवणूक केली आहे. ही बाब लक्षात घेऊन अनिलला १.१० लाख रुपयांचा प्राप्तिकर भरावा लागणार आहे. आता अनिलला हा प्राप्तिकर सरकारला द्यायचा आहे. अनिल तीन प्रकारे आपला प्राप्तिकर भरू शकतो.

पहिला- अनिलने ३१ डिसेंबरपर्यत आपले इन्कम टॅक्स रिटर्न म्हणजे प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करावे. मात्र असे केल्यास अनिल द्यावयाच्या १.१० लाख रुपयांच्या प्राप्तिकरावर दरमहा १ टक्का या हिशोबाने दंड आकारला जाईल.

दुसरा- दंड टाळण्यासाठी जर अनिलने ३१ जुलैपर्यत आपल्यावर प्राप्तिकर आणि प्राप्तिकर विवरणपत्र दोन्हीही जमा केला तर त्याला फक्त १.१० लाख रुपयांचा कर भरावा लागेल. कोणताही दंड लागणार नाही. (अर्थात आता ही ३१ जुलैची तारीख निघून गेली आहे)

तिसरा- दंड टाळण्यासाठी अनिलने जर ३१ जुलैच्या आधीच आपला कर पूर्ण भरला मात्र प्राप्तिकर विवरणपत्र दाखल करायचे राहिले असेल तर त्याच्यावर कोणताही दंड आकारल जाणार नाही. ३१ डिसेंबरपर्यत अनिलला आपले प्राप्तिकर विवरणपत्र जमा करता येईल.

प्राप्तिकर विवरणपत्राआधीच कर कसा भरायचा :- समजा अनिल प्राप्तिकर देणे लागतो. तर अनिल ३१ डिसेंबरपर्यत आपले विवरणपत्र दाखल करू शकतो. मात्र एनएसडीएलची वेबसाईट किंवा एखाद्या करसल्लागाराच्या मदतीने अनिलला प्राप्तिकरदेखील भरता येईल.