Property Act information : नमस्कार मित्रांनो आजच्या या लेखामध्ये आपण महत्वाच्या अशा Property Act in Marathi विषयी माहिती घेणार आहोत. सुनेला आणि मुलीला सासऱ्याच्या आणि वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मिळतो का? हो! तर मग तो किती मिळतो? या संबंधी आपण माहिती घेणार आहोत.
Property Act information in Marathi संपूर्ण माहिती
महिलांना पुरुषांप्रमाणे देखील वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क असतो. फक्त वडिलांच्याच नाही तर सुनेला हा सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये देखील हक्क असतो. यासंबंधी नक्की कायदा काय सांगतो हे आज आपण पाहणार आहोत.
भारतीय कायदा हिंदू उत्तराधिकारी अधिनियम 2005 अंतर्गत संपत्तीमध्ये समान हक्क देण्यात आला आहे. सुनेला प्रॉपर्टी मध्ये आपल्या नवऱ्याच्या शेअर द्वारा हक्क हा मिळतो. आणि मुलींना वडिलांच्या संपत्तीमध्ये मुलांप्रमाणे समान अधिकार दिला जातो. पण सुनेला मिळणार प्रॉपर्टी हक्क हा ठराविक असतो.
Hindu Succession Act in Marathi
मुलगी विवाहित असतो विधवा असो वा अविवाहित असो, तिला संपत्ती मध्ये मिळणार अधिकार हा द्यावा लागतो. कायद्यानुसार मुलगी हक्क मागू शकते, आणि जर वडिलांच्या वारस पात्रता मुलाचे नाव नसेल तर मुलीला वडिलांची सर्व प्रॉपर्टी मिळू शकते.
वडील जर वारस पत्र न लिहिता मृत्यू पावले, तर वडिलांच्या प्रॉपर्टी मध्ये मिळणार अधिकार हा सर्व भावंडांमध्ये 50 – 50 असा वाटप केला जातो.
सुनेचा सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये किती अधिकार असतो?
हिंदू उत्तराधिकार अधिनियम अंतर्गत सुनेला प्रॉपर्टी मध्ये मिळणार हक्क हा ठराविक आणि सीमित असतो. खर तर सुनेला थेट सासाऱ्याच्या प्रॉपर्टी वर हक्क सांगता येत नाही. ती फक्त नवऱ्याच्या प्रॉपर्टी वर अधिकार सांगू शकते.
जर सासू सासऱ्यांचा आणि नवऱ्याचा देखील मृत्यू झाला तर सुनेला बायको म्हणून संपत्तीचा सर्व हक्क दिला जातो. वारस पत्रात जर कोणाचे नाव नसेल याठिकाणी जरी नवऱ्याचे नाव नाही आणि सुनेचे नाव असेल, तर सुनेला सासऱ्याच्या प्रॉपर्टी मध्ये हक्क मिळू शकतो. नवऱ्याच्या मृत्यू नंतर सुनेला प्रॉपर्टी मध्ये हक्क असतो, सासू सासरे तिला अधिकारापासून दूर ठेवू शकत नाहीत.
तर मित्रांनो ही होती Property Act information in Marathi संबंधीची सविस्तर अशी माहिती. जर तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर अशाच माहितीसाठी आमच्या वेबसाईटला भेट देत राहा.