अहमदनगर Live24 टीम, 20 सप्टेंबर 2021 :-  बिग बॉस मराठीचे पुढचे पर्व कधी सुरु होणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली होती. प्रेक्षकांची हीच प्रतीक्षा आता संपली आहे. बहुचर्चित ‘बिग बॉस मराठी’च्या तिसऱ्या पर्वाची आजपासून सुरुवात झाली आहे.

दिग्गज अभिनेते-दिग्दर्शक महेश मांजरेकर यंदाही सूत्रसंचालकाच्या भूमिकेत आहेत. सर्वांचा आवडता आणि तितकाच वादग्रस्त रिअॅलिटी शो बिग बॉस मराठी सिझन प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे.

जवळपास दोन वर्षांनंतर बिग बॉस मराठी प्रेक्षकांच्या भेटील आल्यामुळे चाहत्यांमध्ये उत्सुकता पाहायला मिळते. ‘बिग बॉस मराठी ३’मध्ये

मराठी कलाकारांसोबतच किर्तनकार शिवलीला बाळासाहेब पाटीलची तसचं सामाजिक कार्यकर्त्या तृप्ती देसाई आणि कोळी गीतांसाठी ओळखले जाणीरे गायक दादूस म्हणजेच संतोष चौधरीने सहभाग घेतला आहे.

बिग बॉस मराठी सिझन ३’मध्ये प्रत्येक आठवड्याला वेगळी थिम असणार आहे. या आठवड्यात ‘लेडीज स्पेशल’ थिम असणार आहे. या शोचे होस्ट महेश मांजरेकर यांनी ‘बिग बॉस मराठी ३’ च्या खास घराची सफर घडवली आहेत.

बिग बॉस मराठी कार्यक्रमात इतर बिग बॉस कार्यक्रमाप्रमाणे मनोरंजन क्षेत्रातील 15 सेलिब्रेटी 100 दिवसांपेक्षा जास्त काळ बिग बॉसच्या घरात बंद राहतील.

या कार्यक्रमाचं प्रक्षेपण कलर्स मराठी या वाहिनीवर दररोज रात्री 9 वाजता होईल. याशिवाय वूटवर लाईव्ह स्ट्रीमिंगद्वारेदेखील हा कार्यक्रम पाहायला मिळेल.