गौण खनिज उत्खनन परवानासाठीची मुदत वाढली

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 9 एप्रिल 2021 :- केंद्र सरकारच्या मार्गदर्शक सुचनांच्या आधारे जिल्हाधिकारी अथवा त्यांचे अधिनस्त कार्यालयामार्फत बांधकाम व्यावसायिकांना दिलेल्या गौण खनिज उत्खनन परवानासाठीची मुदतदेखील 6 महिन्यांसाठी वाढविणे आवश्यक आहे.

त्यानुसार 25 मार्च, 2020 नंतर मुदत संपणार्‍या परवान्यासाठी उत्खनन व वाहतूक पूर्ण झाले नसल्यास यापुढे पुढील 6 महिन्यांच्या कालावधीसाठी मुदत वाढविण्यात येत आहे.

या निर्णयामुळे वाळू, दगड खाणमालक, मुरूम, स्टोन क्रशरधारक, डम्परमालकांना दिलासा मिळाला आहे. करोनाच्या संकटामुळे बांधकाम क्षेत्रावर अनिष्ट परिणाम झाला आहे.

त्यामुळे या क्षेत्राला साहित्य पुरवठा करणारी यंत्रणा बर्‍याच अंशी प्रभावित झाली आहे. त्युळे गौणखनिज उत्खनन व वाहतुकीस देण्यात आलेल्या परवान्यांच्या अनुषंगाने हा निर्णय घेण्यात आला आहे.

या वाढीव 6 महिन्यांच्या कालावधीतही उपरोक्त कारणास्तव अप्रत्याशित आपत्कालीन परिस्थितीमुळे निर्माण झालेली असंभवता विचारात घेऊन,

दिलेल्या परवान्यांप्रमाणे बांधकाम व्यावसायिक उत्खनन व वाहतूक पूर्ण न करू शकल्यास योग्य त्या कारणांची नोंद घेऊन आणखी पुढील 3 महिने मुदतवाढ देण्याबाबत जिल्हाधिकार्‍यांनी कार्यवाही करावी असे परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24