रानडुकराच्या शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यू

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 21 सप्टेंबर 2021 :-   रानडुकराचा शिकारीसाठी लावलेल्या जाळ्यामध्ये अडकलेल्या बिबट्याचा मृत्यु झाल्याची दुर्दैवी घटना श्रीगोंदा तालुक्यातील वांगदरीच्या डोमाळवाडी परिसरात घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, तालुक्यातील वांगदरी शिवारातील डोमाळवाडी परिसरात उसाच्या शेतात रानडुकराच्या शिकारीसाठी जाळे लावण्यात आले होते.

या जाळ्यामध्ये बिबट्या अडकल्याचे परिसरातील शेतकर्‍याला समजताच त्यांनी वनविभागाला याबाबत कळविले. वनविभागाने बिबट्याच्या रेस्क्यूसाठी माणिकडोह येथील रेस्क्यू टीमला पाचारण केले.

दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास रेसक्यु टीम घटनास्थळी पोहोचून त्यांनी बिबट्याला भुलीचे इंजेक्शन देऊन त्याला बेलवंडी येथील नर्सरी मध्ये नेण्यात आले.

त्या दरम्यान बिबट्याचा मृत्यू झाल्याचे समोर आले. वनविभागाच्या अनस्थेमुळे बिबट्याचा बळी गेल्याचे बोलले जात आहे. या बिबट्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्याने याची जबाबदारी अधिकारी घेणार का? असा सवाल प्राणी मित्र विचारात आहेत.

Ahmednagarlive24 Office