महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता

Published by
Ahmednagarlive24 Office

अहमदनगर Live24 टी म, 20 सप्टेंबर 2021 :-आखाडा परिषदेचे अध्यक्ष नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू झाला आहे. महंत नरेंद्र गिरी महाराज यांचा मृतदेह प्रयागराज येथील गेस्ट हाउसमध्ये आढळला.

मृतदेहाजवळ पोलिसांना आत्महत्येपूर्वी लिहिलेली एक चिठ्ठीही आढळली. यात एका शिष्यामुळे दुःखी असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

या चिठ्ठीत त्यांनी शिष्य आनंद गिरी यांच्या नावाचा उल्लेख केल्याने आनंद गिरी यांच्यावर संशय व्यक्त केला जात आहे. महंत नरेंद्र गिरी मृत्यू प्रकरणाला आता गंभीर वळण मिळण्याची शक्यता आहे.

कारण, पोलिस तपासा दरम्यान नरेंद्र गिरी महाराज यांच्या खोलीत एक सुसाईड नोट सापडली आहे. ही सुसाईड नोट तब्बल 7 पानी असल्याचं कळतंय. प्रयागराज पोलिसांनी एक निवेदन जारी केलं आहे.

त्यात असं सांगण्यात आलं आहे की घटनास्थळावर जवळपास 7 पानी चिठ्ठी आढळून आली आहे. या चिठ्ठीत महंत नरेंद्र गिरी यांनी त्यांचे शिष्य आनंद गिरी आणि अन्य शिष्यांचं नाव लिहिलं आहे.

तसंच ते अनेक कारणांमुळे मानसिक तणावातून जात होते. त्यामुळे आपण आत्महत्या करत असल्याचं लिहिलं आहे. महंत नरेंद्र गिरी यांनी सुसाईड नोटमध्ये आश्रमबाबत काय करायचं याबाबतही लिहिलं आहे.

तसंच कुणाची काळजी घ्यायची. कुणाला काय द्यायचं आहे, याबाबतही त्यांनी सुसाईड नोटमध्ये उल्लेख केलाय. आपल्या शिष्यांमुळे दु:खी असल्याचं त्यांनी या चिठ्ठीत लिहून ठेवलं आहे. द

रम्यान, नरेंद्र गिरी महाराजांच्या मृत्यूनंतर पंतप्रधान मोदींनी ट्वीट केलं आहे. अतिशय दुःखद घटना आहे. त्यांनी आध्यात्मिक परंपरा जपली.

संत समाजाला एकजूट करण्यात मोठी भूमिका बजावली. त्यांना प्रभू चरणी स्थान मिळू दे, असा पंतप्रधान मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

Ahmednagarlive24 Office