शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मनपा आयुक्तांनी घेतला हा निर्णय

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 7 एप्रिल 2021 :-शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. सोमवारी एका दिवसात नगर शहरात ६६६ रुग्ण आढळून आले आहेत. रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे.

याच पार्शवभूमीवर मनपाने कोरोना रोखण्यासाठी कडक पावले उचलली आहे. शहरातील कोरोनाला अटकाव करण्यासाठी शहरात कोविड केअर सेंटर सुरू करण्यासाठी मंगल कार्यालये ताब्यात घेण्यात येणार आहेत.

तसा आदेश महापालिका आयुक्त शंकर गोरे यांनी मंगळवारी जारी केला. शहरातील कोरोनासाखळी तोडण्यासाठी चाचणी वाढविण्याबरोबरच रुग्णांच्या विलगीकरण कक्षाची व्यवस्था करण्यात येत आहे.

आतापर्यंत महापालिकेने पाच कोविड केअर सेंटर सुरू केले आहेत; तसेच महापालिकेने न्यू आर्टस्‌, अहमदनगर, आठरे पाटील महाविद्यालयाच्या इमारतींची पाहणी केली; परंतु सध्या महाविद्यालये सुरू आहेत.

त्यामुळे महाविद्यालयांच्या इमारतींमध्ये कोविड केअर सेंटर सुरू करणे शक्य नाही. महाविद्यालयांच्या इमारत मिळत नसल्याने महापालिकेने मंगल कार्यालयांची चाचपणी केली. शासनाने नियम पाळून लग्नसमारंभासाठी परवानगी दिलेली आहे.

त्यामुळे मंगल कार्यालयांनीही इमारत देण्यास नकार दिला होता; परंतु इमारत मिळत नसल्याने मंगल कार्यालये ताब्यात घेण्याचा आदेश जारी करण्यात आला असून, पहिल्या टप्प्यात सहा मंगल कार्यालये ताब्यात घेतली जाणार आहेत.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24