विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी जीवदान दिले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 29 मे 2021 :- विहिरीत पडलेल्या हरणाला वनविभागाच्या कर्मचाऱ्यानी जीवदान दिले. ही घटना नगर तालुक्यातील इमामपूर येथे घडली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कि, इमामपूर येथील बहिरोबामळा परिसरातील गोवर्धन आवारे यांच्या विहिरीत हरीण पडले होते. दरम्यान याबाबतची माहिती इमामपूरचे सरपंच भीमराज मोकाटे यांनी वनविभागाला दिली.

वनविभागाचे कर्मचारी संजय सरोदे यांनी स्थानिकांच्या मदतीने हरणाला वर काढून जीवदान दिले. मुकेश साळवे या तरुणाने शिडीच्या साहाय्याने विहिरीत उतरुन हरणाला वर काढले. नगर तालुक्यातील जेऊर परिसरातील डोंगररांगांमध्ये मोठ्या प्रमाणात वन्य प्राण्यांचे वास्तव्य आहे.

हरणांची संख्या जास्त आहे. उन्हाळ्यात डोंगरात पिण्यासाठी पाणी उपलब्ध नसल्याने पाण्याच्या शोधार्थ वन्य प्राणी मानवी वस्तीकडे धाव घेतात.

कुत्र्यांच्या हल्ल्यात तसेच महामार्गावरील अपघातात वन्य प्राण्यांना जीव गमवावा लागल्याच्या परिसरात घटना घडलेल्या आहेत. त्यामुळे वनविभागाच्यावतीने परिसरातील डोंगरात मोठ्या प्रमाणात पाणवठे बनून त्यामध्ये पाणी सोडण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24