जयंती कार्यक्रमातून युवकांचा नियमांचे पालन करुन कोरोनाशी लढण्याचा निर्धार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 15 एप्रिल 2021 :- निमगाव वाघा (ता. नगर) येथे एकता फाऊंडेशन ट्रस्टच्या वतीने युवकांनी वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी केली.

कोरोनाचे संक्रमण वाढत असताना फाऊंडेशनच्या कार्यालयात वर्चुअल डॉ. बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

या जयंती कार्यक्रमात युवकांनी नियमांचे पालन करुन कोरोनाशी लढण्याचा निर्धार व्यक्त केला. फाऊंडेशनचे अध्यक्ष अतुल फलके यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले.

यावेळी बाबासाहेब गायकवाड, दिपक जाधव, आकाश पुंड, प्रदीप शिंदे उपस्थित होते. वर्चुअल पध्दतीने घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात युवकांनी कोरोनाशी लढण्यासाठी व गाव सुरक्षित ठेवण्याकरिता विविध मते मांडली.

अतुल फलके म्हणाले की, बाबासाहेब आंबेडकर यांनी शिका, संघटित व्हा व संघर्ष करा, हा संदेश आज या कोरोनाशी लढण्यासाठी बळ देणारा आहे.

मागील वर्षी आलेल्या कोरोना संक्रमणाने मनुष्याने हा आजार टाळण्यासाठी त्याचे उपाययोजना शिकण्याची गरज आहे.

तर संघटितपणे ही महामारी थोपविण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे. बाबासाहेबांनी दिलेला विचार आजही या कोरोना महामारीत प्रेरणा देणार असल्याचे सांगितले.

या वर्चुअल कार्यक्रमात अरुण अंधारे, रामदास पवार, किरण जाधव, सागर फलके, महेश फलके, राहुल फलके, विकास जाधव, सुधीर खळदकर, हुसेन शेख यांनी ऑनलाईन सहभाग नोंदवून गावातील कोरोना हद्दपार करण्यासाठी विविध मते मांडली.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24