कोपरगाव शहराचा विकास माझ्याच काळात जास्त झाला- नगराध्यक्ष वहाडणे

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 1 सप्टेंबर 2021 :- कोपरगाव शहराचा विकास माझ्या कार्यकाळत जास्त झाला आहे इतर कोणत्याही पक्षाचे नगराध्यक्ष करू शकले नाही नगराध्यक्ष विजय वहाडणे. कोपरगाव शहरातील बऱ्याच रस्त्यांची दुरावस्था झालेली असल्याने नागरिकांना अतोनात त्रास सहन करावा लागत आहे.

या विषयावर शहरात अनेक आंदोलने होत आहेत.अनेक प्रकारच्या प्रतिक्रिया-बातम्या नित्य येत आहेत.रस्ते व्यवस्थित व्हावेत यात कुठलीही शंका नाही. आंदोलकांच्या मागण्याही योग्यच आहेत. तरीही जनतेला पुन्हा एकदा वस्तुस्थिती लक्षात आणून देणे गरजेचे आहे.

फेब्रुवारी २०२१पासून शहरातील महत्वाचे रस्त्यांची व इतरही विकासकामे वादात-राजकारणात अडकून आता तर हा विषय मे.उच्च न्यायालायात न्यायप्रविष्ट आहे. लवकरच न्याय मिळेल याची मला खात्री आहे.न्यायप्रविष्ट बाब असूनही केवळ जनतेला वस्तुस्थिती लक्षात आणून देणे माझे कर्तव्यच आहे.

त्यानंतरही कुणी मे.सर्वोच्च न्यायालयात जाऊन पुन्हा अडथळे आणले तर कुठलाही धोका नको म्हणून मी दिल्लीमधील वकिलांशी कॅव्हेटबाबत चर्चाही करून ठेवलेली आहे. मी नगराध्यक्ष झाल्यापासून ४ वर्षात प्रत्येक प्रभागात किमान दिड ते दोन कोटी रुपयांची विकासकामे मार्गी लावलेली आहेत.

आजपर्यंत कुणाच्याही काळात ४ वर्षात इतकी विकासकामे झालेली नाहीत.कुठलाही भेद न करता प्रत्येक प्रभागात सिमेंटकाँक्रीट रस्ते,डांबरीरस्ते,खडीकरण, गटारी-भुयारी गटारी,पेव्हर ब्लॉक,शौचालय इ.कामे पूर्ण केलेली आहेत. एस.जी.विद्यालय रस्ता,गुरुद्वारा रस्ता,येवला रोड व इतरही अनेक रस्ते,खुले नाट्यगृह नूतनीकरण आणि इतर विकासकामे करण्यासाठी कार्यादेशही दिलेले आहेत.

या कामांना स्थगिती आणली नसती तर २ महिन्यांपूर्वीच सदरची कामे पूर्ण होऊन जनतेला खराब रस्त्यांचा त्रासही सहन करावा लागला नसता. त्या २८ कामांशिवाय धारणगाव रस्ता,आचारी हॉस्पिटल ते छ. संभाजी महाराज पुतळा रस्ता, गोकुळनगरीकडे जाणारा मार्ग,एस एस जी एम कॉलेज समोरील रस्ता,छ. संभाजी महाराज पुतळा ते नागरे पेट्रोल पंप रस्ता इ.अनेक कामे प्रस्तावित आहेत.

लवकरच निविदा प्रसिद्ध करून ही कामेसुद्धा पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. त्याचप्रमाणे डॉ.नाईकवाडे हॉस्पिटल-दत्त बेकरी-राजप्रेम ते कोर्ट रोड हा रस्ता आणि संत गोरोबाकाका मंदिर-१०५ हनुमाननगर ते आचारी हॉस्पिटल,ईदगा मैदान ते कोर्ट रोड इ.रस्तेही होणार आहेत.

मी आज तरी कुणावरही दोषारोप करणार नाही .उर्वरित काळात सर्वांच्या सहकार्याने जास्तीत जास्त विकासकामे पुर्ण करण्याच्या प्रयत्नात नगराध्यक्ष म्हणून मी आहे असे वहाडणे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे सांगितले आहे.

अहमदनगर लाईव्ह 24