अहमदनगर Live24 टीम, 18 फेब्रुवारी 2021:-कोरोनामुळे गेल्या अनेक महिन्यांपासून शिर्डी येथील साई मंदिर बंद ठेवण्यात आले होते.
मात्र काही महिन्यांपूर्वी हे मंदिर पुन्हा एकदा भाविकांना दर्शनासाठी खुले करण्यात आले आहे. दरम्यान साईंच्या दर्शनासाठी भाविकांचा ओघ वाढला होता.
नुकतेच पुणे येथील साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला. या हाराची किंमत ८ लाख ६५ हजार २०० रुपये इतकी आहे.
दरम्यान साई संस्थानचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र ठाकरे यांच्याकडे सोन्याचा हार या भाविकांनी सुपुर्द केला आहे. यावेळी मुख्यलेखाधिकरी तथा प्रशासकीय अधिकारी बाबासाहेब घोरपडे उपस्थित होते. शिर्डी- पुणे येथील दानशुर साईभक्त श्वेता रांका यांनी साईचरणी २०० ग्रँम वजनाचा सुवर्ण हार अर्पण केला.