अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात आतापर्यंत 2 लाख 93 हजार जणांचे करोना लसीकरण झाले असून रविवारी रात्री उशीरापर्यंत 16 हजार डोस जिल्ह्यासाठी मिळणार होते.
मिळणार्या लशींचा साठा हा अवघ्या एक दिवसाचा असून मंगळवारपर्यंत नव्याने लसींचा साठा न आल्यास लसीकरण ठप्प होण्याची शक्यता आहे.
गेल्या आठवड्यात 3 लाख लसींची मागणी नोंदविण्यात आली होती. प्रत्यक्षात अवघी 25 हजार लस उपलब्ध झाली. त्यात रविवारपर्यंत लसीकरण करण्यात आले आहे.
आज सोमवारी लसीकरण बंद राहणार असून रविवारी रात्री उशीरा 16 हजार लस जिल्ह्यात दाखल होणार असून त्याचे वाटप आज केल्यानंतर मंगळवारी लसीकरण सुरू होणार आहे.
मात्र, जिल्ह्यात 165 केंद्रावर एकाच दिवशी लसीकरणासाठी 15 हजारांच्या जवळपास लसची आवश्यकता असल्याने येणारी लस ही अवघी एकाच दिवस पुरणार असल्याचे सुत्रांनी सांगितले.
जिल्ह्यात दोन लाखाहून अधिकचे लसीकरण पूर्ण :- जिल्ह्यात आतापर्यंत आरोग्य (शासकीय, खासगी आणि महिला बालकल्याण विभाग) यातील ४१ हजार २६७ महसूल विभाग 1 हजार 927, पोलीस 4 हजार 781, पंचायत राज 4 हजार 643,
गृह व शहरी कामकाज 2 हजार 335, रेल्वे सुरक्षा विभाग 417 आणि ज्येष्ठ नागरिक 2 लाख 37 हजार 889 जणांचे करोनाचे लसीकरण झालेले आहे.