अहमदनगर Live24 टीम, 27 मे 2021 :- कोरोना पॉझिटिव्ह रेट ज्या जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक आहे अशा जिल्ह्याच्या समावेश रेडझोन मध्ये करण्यात आला आहे.
अहमदनगर जिल्ह्यामध्ये हा रेट २५ टक्के असल्याचे राज्य शासनाचे म्हणणे आहे, मात्र दैनंदिन रुग्णसंख्येच्या तुलनेत पॉझिटिव्हिटी रेट हा दहा टक्के असल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्याला १ जूननंतर दिलासा मिळणार की निर्बंध आणखी वाढणार, याकडे नागरिकांचे लक्ष लागले आहे.
राज्यातील १५ जिल्ह्यांत अहमदनगरचा समावेश करण्यात आला आहे. राज्य शासनाने दिलेल्या माहितीनुसार अहमदनगर जिल्ह्याचा कोरोना पॉझिटिव्हिटी रेट २५ टक्के असल्याचे स्पष्ट केले आहे. त्यामुळे नगर जिल्ह्यातील परिस्थिती गंभीर असल्याचे मत सरकारने व्यक्त केले आहे.
मात्र सध्या जिल्ह्यातील रुग्णांची संख्या कमी झाली आहे एप्रिल महिन्यात दररोज पॉझिटिव्ह रेट ४०ते ५० टक्के पर्यंत होता तरी एकूण रुग्ण संख्या च्या तुलनेत हा पॉझिटिव्ह रेट ३२ टक्के दर्शविण्यात आला आहे. प्रशासनाकडून आतापर्यंत झालेल्या चाचणीची संख्या लक्षात घेऊन पॉझिटिव्ह रेट काढला जात आहे.
त्यामुळे अहमदनगर जिल्ह्याच्या २५ टक्के दिसत आहे. दरम्यान राज्यातील काही जिल्ह्यामध्ये कोरोना नियंत्रणात येत आहे, तर काही जिल्ह्यांतील परिस्थिती चिंताजनक आहे.
त्यामुळे राज्यात सरसकट लॉकड़ाऊन करण्याऐवजी जिल्हानिहाय निर्बंध निश्चित करण्यात येणार आहेत. त्यामुळे अहमदनगर जिल्ह्यातील निर्बंध कडक करायचे की नाही, याबाबतचा अधिकार जिल्हाधिकारी यांच्याकडे राहणार आहे.