डॉक्टरचा अजबच दावा; माझ्या औषधाने कोरोना झटक्यात बरा होतो

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 एप्रिल 2021 :-पुण्यात मिनी लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. पुण्यात लसीकरणावरही भर दिला जात आहे.

एकीकडे ही परिस्थिती असताना, दुसरीकडे पुण्यातील एका डॉक्टरांनी कोरोनावर आयुर्वेदिक औषध शोधल्याचा दावा केला आहे.

आतापर्यंत 100 पेक्षा जास्त कोरोना रुग्णांना हे औषध दिले असून, ते 100 टक्के कोरोनामुक्त झाल्याचा दावा या डॉक्टरने केला आहे.

डॉ. सारंग फडके यांनी कोरोनावर एका नावाने आयुर्वेदिक औषध तयार केलं आहे. या औषधामुळे कोरोनावर 100 टक्के रामबाण उपाय होत असल्याचा त्यांचा दावा आहे.

महत्त्वाचं म्हणजे डॉ. फडके यांनी गेल्या वर्षीपासून आपल्याकडे येणाऱ्या रुग्णांना हे औषध देत असून, हे रुग्ण बरे झाल्याचा दावा केला आहे.

इतकंच नाही तर त्यांनी या औषधाबाबत आयुष मंत्रालयाशी संपर्क साधून, या औषधाची दखल घेण्याची विनंती केली आहे.

हे औषध आयुर्वेदिक असून त्याचे कुठलेही साईड इफेक्ट्स नसल्याचं डॉक्टरांचे म्हणणं आहे. त्यामुळे या औषधाला जर सरकारने मान्यता दिली तर

कोरोना रुग्णांचा आकडा आणि मृत्यूदर कमी करण्यास मदत होईल असं डॉ. सारंग फडके यांचं म्हणणं आहे.

डॉक्टर सारंग फडके यांनी हा दावा जरी केला असला, तरी कोणत्याही औषधाला सहजासहजी परवानगी मिळत नाही.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24