अहमदनगर जिल्ह्यातील त्या महिलेचा खून करणाऱ्या आरोपीला श्वानाने ओळखले आणि…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:- संगमनेर तालुका पोलीस स्टेशन हद्दीत मल्हारवाडी कर्हे शिवारात २२ मार्च रोजीएका शेतात एका महिलेचा मृतदेह आढळून आला होता.

याबाबत संगमनेर तालुका पोलिसांनी वेगाने तपासाची चक्रे फिरवत अहमदनगर येथील श्वान पथकाला पाचारण केले. यातील ‘रक्षा’ नावाच्या श्वानाने तेथे उपस्थित असलेल्या आरोपीला शोधून दिले.

यामुळे अवघ्या दोन तासांत गुन्ह्यातील आरोपीचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले. या याबाबत अधिक माहिती अशी कि, मयत महिला मंगल वामन पथवे (वय ४५ रा. उंचखडक हल्ली रा. कर्हे शिवार संगमनेर) ही महिला राजू शंकर कातोरे यांच्यासह रामदास म्हातारबा सानप (रा. कर्हे) यांची शेती वाट्याने करीत असल्याची माहिती मिळाली.

मयत महिलेबाबत राजू शंकर कातोरे यानेच पोलिसांना फोनवरून कळविले. सखोल तपास करता तसेच पोलीस श्वान पथकाची मदत घेऊन सदर महिलेचा खून राजू शंकर कातोरे यानेच केला असल्याचे उघडकीस आले असून संगमनेर पोलिसांनी केवळ २ तासांतच सदरचा गुन्हा उघडकीस आणला आहे.

आरोपी राजू शंकर कातोरे याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्याचा पुढील तपास पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार हे करीत आहे.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24