मारुती मंदिराची दानपेटी फोडून ३० हजार लांबवले

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 30 जून 2021 :- नेवासे तालुक्यातील लोहोगाव येथील मारुती मंदिर, विठ्ठल रुख्मिनी मंदिर, संत तुकोबाराय मंदिर, भारती बाबा समाधी परिसरातील दानपेटी मंगळवारी सायंकाळी सात वाजता फोडून दानपेटीतील अंदाजे २५ ते ३० हजारांची रक्कम चोरट्यांनी लांबवली.

एका खोलीचेही कुलूप तोडून साउंड सिस्टिमचे नुकसान केले. २ कॉडलेस माइक ही चोरट्यांनी लांबवले. सायंकाळी हरिपाठ करण्यासाठी आलेल्या भजनी मंडळीच्या निदर्शनास ही बाब लक्षात आली.

या घटनेची माहिती सोनई पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक रामचंद्र कर्पे यांना देण्यात आली.

त्यांनी घटनास्थळाचा पंचनामा करण्यासाठी पोलिस पाठवले. या चोरीच्या घटनेचा लवकरात लवकर तपास व्हावा, अशी मागणी लोहोगाव ग्रामस्थांच्या वतीने सरपंच आदिनाथ पटारे, उपसरपंच बापुराव कल्हापुरे,

निसार सय्यद, जालिंदर ढेरे, अण्णा ढेरे, विकास ढेरे, सोपान ढेरे, पोलिस पाटील सीताराम रावडे, जालिंदर महाराज ढेरे, सुखदेव महाराज ढेरे, दिनकर नागदे, नवनाथ ढेरे, गणेश सिकची आदींसह मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते.

अहमदनगर लाईव्ह 24