Cheapest Electric Scooter : सध्या पेट्रोल आणि डिझेलच्या किमती गगनाला भिडल्या आहेत. त्यामुळे अनेकजण इलेक्ट्रिक वाहने खरेदी करत आहेत. परंतु, मागणी जास्त असल्यामुळे या वाहनांची किंमत खूप जास्त आहे. अशातच भारतातील दिग्ग्ज कंपनी Ola ने आपल्या दोन नवीन इलेक्ट्रिक वाहने लाँच केली आहेत.
सर्वात महत्त्वाचे म्हणजे या स्कुटरची किंमत खूप कमी आहे. त्यामुळे अनेकांचे आता स्वस्तात इलेक्ट्रिक स्कुटर घेण्याचे स्वप्न पूर्ण आहे. कंपनीने यात अनेक जबरदस्त फिचर दिली आहेत. कंपनीच्या या स्कुटर सिंगल चार्जवर चांगली देत आहेत.
किती देणार रेंज
2 kWh बॅटरी पॅकसह पॅक केलेली, Ola S1 ही स्कूटर सिंगल चार्जवर 91 किमी (IDC) ची रेंज ऑफर करत असल्याचे सांगण्यात येत आहे. यामध्ये दिलेली इलेक्ट्रिक मोटर 8.5 kW (11.3 bhp) पॉवर जनरेट करत आहे. तर या स्कूटरचा टॉप स्पीड 90 किमी प्रतितास इतका आहे.
तर कंपनीच्या, Ola S1 Air च्या या स्कुटरला सिंगल चार्जवर 85 किमी (IDC) ची रेंज मिळणार आहे. कंपनीच्या या स्कूटरचा टॉप स्पीड 85 किमी प्रतितास इतका आहे. कंपनीने यापूर्वी ही स्कूटर 2.5 kWh बॅटरी पॅकसह आणली असून आता काढून टाकली आहे. ज्या ग्राहकांनी 2.5 kWh बॅटरी पॅक बुक केला आहे ते स्वयंचलितपणे 3 kWh बॅटरी पॅकवर अपग्रेड केले जाणार आहेत, जी चार्ज केल्यानंतर 125 किमीची रेंज देते.
लहान बॅटरी का महत्त्वाची
ओला इलेक्ट्रिकचे सह-संस्थापक भविश अग्रवाल म्हणाले की, ग्राहकांकडून मिळालेल्या फीडबॅकवरून हे समजले जात आहे की ते एका दिवसात सरासरी 20-30kmph वेगाने स्कूटर चालवतात. त्यामुळे 130-140 किमीचा पल्ला अनावश्यक होता. म्हणूनच 2 kWh बॅटरी अधिक महत्त्वाची आहे.
आजपासून बुकिंग सुरु
दरम्यान, जर तुम्हाला नवीन Ola S1 Air खरेदी करायची असेल तर ती आजपासून बुक करता येईल. परंतु, हे लक्षात घ्या की या स्कूटरची डिलिव्हरी जुलैमध्ये सुरू होणार आहे.