‘ह्या’ सरकारचा मोठा निर्णय : दारू पिण्याचे वय केले…

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 मार्च 2021:-दिल्लीमध्ये दारू पिण्याचे कायदेशीर वय 25 वर्षांवरून 21 वर्ष करण्यात आले आहे. यासह दिल्ली सरकारने आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे.

आता दिल्ली सरकार कोणत्याही नवीन दारूच्या दुकानांना मान्यता देणार नाही. हा निर्णय लागू झाल्यानंतर दिल्लीमध्ये दारू विक्रीसंदर्भातील नियम आणखी कडक होणार असल्याचे दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांनी सांगितले आहे.

मागील काही दिवसांपासून दिल्लीमध्ये दारू पिण्यासाठीचे वय बदलले जाऊ शकते अशी चर्चा होती. मात्र, दिल्ली सरकारने हा निर्णय तडकाफडकी घेतलेला नाही.

तर एका समितीने दिल्ली सरकारला दारू पिण्याचे वय 21 वरुन 18 करण्याचा सल्ला दिला होता. दिल्ली सरकारने मागील वर्षात सप्टेंबर महिन्यात दारू विक्री आणि दारुचे सेवन याविषयी सूचना देण्यासाठी ही समिती नेमली होती.

एक्साईज कमिशनर यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नेमण्यात आली होती. याच समितीने दिलेल्या शिफारशीवरुन दारु पिण्याचे वय 25 वरुन 21 वर्षे करण्यात आलेय.

मनीष सिसोदिया यांनी असेही सांगितले की, आता नवीन दारूची दुकाने उघडली जाणार नाहीत. म्हणजेच आजच्या तारखेला दिल्लीत दारूच्या दुकानांची संख्या तशीच राहील. दिल्लीत सध्या 850 दारूची दुकाने आहेत.

त्यापैकी 60% सरकारी आणि 40% खाजगी आहेत. दिल्लीचे उपमुख्यमंत्री यांनी जाहीर केले की, दिल्लीत दारूचे कोणतेही नवीन दुकान उघडले जाणार नाही.यासह शासकीय दारूची दुकानेही बंद ठेवण्यात येणार आहेत.

सध्या अस्तित्त्वात असलेल्या सरकारी दारूच्या दुकानांचा लिलाव केला जाईल आणि खाजगी हाती देण्यात येतील. दिल्लीत नवीन उत्पादन शुल्क धोरण आल्यानंतर मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनीही त्याचे कौतुक केले.

नवीन धोरण लागू झाल्यानंतर दारू माफियांना आळा घालणार असल्याचे त्यांनी ट्विट केले आहे. हे बदल रोखण्यासाठी दारू माफिया काहीही करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24