Electricity Saving Tips : वीजबिल जास्त येतंय नो टेन्शन ! बसवा हे उपकरण; वीजबिल येईल कमी

Electricity Saving Tips : तुमच्या मीटरचे बिल जास्त येत असल्याने तुम्हीही त्रस्त झाला असाल. मात्र उन्हाळ्यापेक्षा हिवाळ्यात जास्त बिल येत असते. तुम्ही म्हणाल ते कस काय ? तर हो कारण हिवाळ्यात हिटर आणि गिझरमुळे जास्त बिल येते. मात्र ते बिल कमी यावे यासाठी तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत.

आज तुमच्यासाठी इलेक्ट्रीसिटी टिप्स घेऊन आलो आहोत ज्याचा वापर करून वीज बिल कमी येते आणि वीज बिघाड झाल्यावरही ते वापरले जाऊ शकते.

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

पोर्टेबल सोलर जनरेटर उपकरण

तुम्हाला वारंवार वीजपुरवठा खंडित होत असेल किंवा वीज बिल खूप जास्त असेल तर त्यासाठी तुम्ही तुमच्या घरात पोर्टेबल सोलर जनरेटर लावू शकता. याचा वापर करून घरातील सर्व इलेक्ट्रिकल उत्पादने चालू शकतात. ते वापरण्यासाठी विजेची गरज नाही.

या उपकरणाची वैशिष्ट्ये

पोर्टेबल सोलर जनरेटरचे वैशिष्ट्य म्हणजे ते सूर्यप्रकाशाने चार्ज होते. मात्र, जर तुम्ही ते सूर्यप्रकाशाने चार्ज करू शकत नसाल, तर तुम्ही फोनप्रमाणे चार्जर लावून चार्ज करू शकता. यात चार्जिंग पॉवर प्लग आणि चार्जिंगसाठी यूएसबी पोर्ट देखील आहे.

याचा वापर घर आणि कार्यालयात वीज म्हणून करता येतो. घरगुती उत्पादने किंवा मोबाइल फोन पूर्ण चार्ज केल्यानंतर या उपकरणाद्वारे चार्ज करता येतात. याशिवाय पंखा, एसी आणि कुलरचाही वापर करता येतो.

उपकरणाची किंमत

पोर्टेबल सोलर जनरेटरची किंमत 10,000 ते 15,000 रुपयांपर्यंत असू शकते. तुम्ही ते ऑनलाइन किंवा ऑफलाइन खरेदी करू शकता. यात म्युझिक सिस्टीम आणि इन-बिल्ट बॅटरीसारखे फिचर्स आहेत.