गॅसच्या पाइपलाइनला धडकून अभियंता ठार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 23 जुलै 2021 :-  औरंगाबाद महामार्गावर खडका फाट्यानजीक पतंजली कंपनी समोर महामार्गालगत सुरु असलेल्या गॅस पाईप लाईनच्या पाइपवर कार धडकून अपघातात एक जण ठार झाल्याची घटना घडली.

अभियंते राजकुमार नारायण बडवे असे मृताचे नाव आहे. चिखली येथून दुपारी ४ वाजेच्या सुमारास पनवेल येथे जाण्यासाठी सिडको मुंबईचे (बेलापूर) अभियंते राजकुमार नारायण बडवे (५४) व त्यांच्या सोबत अरुण सोपानराव जाधव, कमलाकर शेषराव कांबळे हे निघाले होते.

खडका फाट्यानजीक आले असता गाडीवरील ताबा सुटल्याने रस्त्याच्याकडेला असलेल्या गॅस पाइपलाइनवर त्यांची गाडी धडकली. यात बडवे ठार झाले.

घटनास्थळी नेवासे पोलिस स्टेशनचे पो.नि.विजय करे,पो.कॉ.अशोक कुदळे ,केवल राजपूत,जयवंत तोडमल यांनी धाव घेतली.

जखमींना उपचारासाठी नेवासेफाटा येथील रुग्णालयात दाखल केले. तेथे बडवे यांना मृत घोषित करण्यात आले. अन्य दोघांवर उपचार सुरु आहेत.

अहमदनगर लाईव्ह 24