Boult Rover Launch in India : बहुप्रतीक्षित स्मार्टवॉचची झाली एंट्री, स्वस्तात खरेदी करता येणार

Boult Rover Launch in India : सध्या मार्केटमध्ये स्मार्टफोनप्रमाणेच स्मार्टवॉचही लाँच होत आहेत. ग्राहकांची मागणीनुसार वेगवेगळ्या कंपन्या फीचर्समध्ये बदल करत असतात. विशेष करून फिटनेसची आवड असणारे ग्राहक स्मार्टवॉचचा जास्त वापर करत आहेत.

जर तुम्हीही नवीन स्मार्टवॉच घेण्याच्या विचारात असाल, तर ही बातमी तुमच्या कामाची आहे. कारण बोल्ट रोव्हर स्मार्टवॉचची भारतात एंट्री झाली आहे. जाणून घेऊयात किंमत आणि फीचर्स यासह सर्व काही..

ब्रेकिंग बातम्या मोफत वाचण्यासाठी इथे क्लिक करा

स्पेसिफिकेशन

या स्मार्टवॉचच्या स्पेसिफिकेशनबद्दल सांगायचे झाले तर यामध्ये 1.3-इंचाचा एचडी एमोलेड डिस्प्ले असून त्याची स्क्रीन 150 क्लाउड आधारित वॉचफेस आणि 600 निट्स पीक ब्राइटनेससह येते. तसेच या स्मार्टवॉचमध्ये एक फिजिकल बटण कंपनीने दिले असून ते नेव्हिगेशनला सपोर्ट करते. स्मार्टवॉचमध्ये इनबिल्ट स्पीकर, माइक आणि ब्लूटूथ कॉलिंगचा सपोर्टही दिला आहे.

फीचर्स

त्याचबरोबर कंपनीने वापरकर्त्यांसाठी स्मार्टवॉचमध्ये झिंक अलॉयच्या बिल्ड गुणवत्तेसह इतर फीचर्स दिली आहेत. या फीचर्समुळे वापरकर्त्यांना त्यांच्या आरोग्याचा मागोवा घेता येईल. यात स्लीप मॉनिटर, हार्ट रेट सेन्सर आणि SpO2 सेन्सरचा सपोर्ट आहे. खास करून महिलांसाठी पीरियड ट्रॅकर फीचर कंपनीने दिले आहे.

तसेच खेळाशी निगडित इतर फीचर्सही दिली आहेत. यामध्ये चालणे, पोहणे, योगा आणि धावणे यासारखे अनेक क्रीडा प्रकार उपलब्ध आहेत. यात 10 दिवसांचा बॅटरी बॅकअप सपोर्ट मिळतो. पाणी प्रतिरोध आणि धूळ प्रतिरोधासाठी IP68 रेटिंगही मिळाले आहे.

किंमत

या स्मार्टवॉचच्या दोन आवृत्त्या असून एक म्हणजे क्लासिक स्विच आणि दुसरी म्हणजे फ्लिप आहे. या भारतात लाँच केल्या आहेत. यामध्ये स्टँडर्ड ब्लॅक स्ट्रॅप, हिरवा आणि निळा रंगाचा रंग पट्टा पर्याय त्याच्या फ्लिप आवृत्तीसह मिळत आहेत.

तर, क्लासिक स्विच आवृत्ती तपकिरी लेदर प्राथमिक पट्टा आणि नारिंगी लेदर दुय्यम पट्टा आवृत्तीसह मिळत आहेत. विशेष म्हणजे या दोन्ही आवृत्त्यांची किंमत एकच आहे. याची भारतातील किंमत 2,999 रुपये इतकी आहे. तुम्हाला ते कंपनीच्या अधिकृत साइटवरून किंवा फ्लिपकार्टवरून सहज खरेदी करता येईल.