अहमदनगर Live24 टीम, 02 डिसेंबर 2021 :- देशात आणि राज्यात कोरोनामुळे अनेकांनी प्राण गमावलेत. राज्य सरकारने कोरोनामुळे मृत्यू पावलेल्या व्यक्तीच्या कुटुंबास ५० हजार रुपये मदत देण्याची घोषणा केली होती.
ही रक्कम पात्र लोकांच्या बँकेत थेट जमा होईल असं सांगितले होते. ऑनलाईन अर्ज दाखल करावा लागणार अर्जदाराने mahacovid19relief.in या वर लॉगिन करणे आवश्यक राहील.
तसेच यासाठी https://epassmsdma.mahait.org/login.htm यावर देखील लिंक देण्यात आली आहे. अर्जदारास त्यांचा आधार क्रमांक, मृत व्यक्तीचा तपशील जसे मृत्यू प्रमाणपत्र आणि रुग्णालयाचा तपशील (पर्यायी) या कागदपत्रांच्या आधारे त्याचा स्वत:चा मोबाईल क्रमांक वापरुन सहाय्य मिळण्यासाठी लॉगिन करता येईल.
केंद्र शासनाकडे ज्यांच्या कोविड १९ मुळे मृत्यूची नोंद झालेली आहे. अशा व्यक्तींच्या नातेवाईकाचा अर्ज इतर कोणत्याही कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येईल.
इतर प्रकरणी, कोविड-१९ मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र असेल तर अशी प्रकरणे देखील इतर कागदपत्रांची मागणी न करता मंजूर करण्यात येतील.
अर्जदाराकडे मृत्यूचे कारण दर्शविणारे वैद्यकीय प्रमाणपत्र नसेल तर कोविड-१९ मुळे मृत्यू झाल्याच्या पुष्ठर्थ कागदपत्रे अर्जदारास अर्जासोबत द्यावी लागतील.
प्रकरण नामंजूर झाले तर काय करणार? जर एखादे प्रकरण नामंजूर झाल्यास त्यावरअर्जदारास जिल्हास्तर/
महानगरपालिका स्तरावर तक्रार निवारणासाठी गठीत करण्यात आलेल्या तक्रार निवारण अपिल करण्याचे व या समितीस अशा प्रकरणांची सुनावणी घेऊन अंतीम निर्णय देण्याचे अधिकार असतील. अर्ज अंतिमत: मंजूर करण्याचे अधिकार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणास राहतील.