स्मशानभूमीतील वणवा पेटलेलाच; पुन्हा १७ मृतदेहांवर अंत्यसंस्कार

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 12 एप्रिल 2021 :-जिल्ह्यात वाहतो कोरोनाबाधितांची आकडेवारी आता चिंतेचे कारण बानू लागली आहे. यातच बाधितांच्या आकडेवारी बरोबरच जिल्ह्यात कोरोनामुळे मृत्यूची संख्या देखील वाढू लागली आहे.

जिल्हा शासकीय रुग्णालयात दिवसभरात ३९, तर खाजगी रुगणालयांत मृतांची संख्या ५ इतकी आहे. त्यापैकी ३७ जणांवर अमरधाम येथे अंत्यविधी करण्यात आले असून, उर्वरित सात जणांवर दफनभूमीत अंत्यसंस्कार झाले.

अमरधाम येथे विद्युतदाहिनीत दिवसभरात २० मृतदेहांवर अंत्यसंस्कार करण्यात आले. उर्वरित १७ जणांवर एकाचवेळी विद्युतदाहिनीबाहेर अंत्यविधी करण्यात आला असल्याचं पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

कोरोनाने शहरासह जिल्ह्यात कहर माजविला आहे. मृतांचा आकडा जिल्ह्याची चिंता वाढविणारा आहे. गेल्या गुरुवारी व शुक्रवारी या दोन दिवसांत कोरोनाने १०० जणांचा बळी घेतला. रविवारी दिवसभरात पुन्हा मृतांचा आकडा ४४ वर पोहोचला.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24

Published by
अहमदनगर लाईव्ह 24