या ठिकाणी सुरु झाले राज्यातील पहिले लहान मुलांचे कोविड हॉस्पिटल

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 2 मे 2021 :- कोरोनानं देशात हाहाकार माजवलेला असून, राज्यातही कोरोनाचं थैमान सुरू आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणात नवजात बालके आणि लहान मुलांमध्ये कोरोनाचे संक्रमण आढळू लागल्याने अशा बालकांवर उपचारासाठी पहिले कोविड हॉस्पिटल पंढरपूरमध्ये सुरु होणार आहे.

त्यामुळे पंढरपूर येथे बालरोगतज्ज्ञ डॉक्टर शीतल शहा यांनी राज्यातील पहिले बाल कोविड हॉस्पिटल उभारलेय.

यामध्ये नवजात बालक आणि लहान मुलांना कोरोनावर उपचार मिळण्यासाठी 15 बेडची अत्याधुनिक अशी सोय करण्यात आलीय.

कोरोनाचा प्रसार गरोदर महिलांना झाल्यानंतर अनेक बालकांना हा त्रास मातेच्या दुधामुळे होऊ लागल्याचे समोर येत असून यातूनच त्यांच्यात कोरोनाची लक्षणे दिसू लागल्याने प्रशासन हैराण झाले होते.

पंढरपूर मधील डॉ. शीतल शहा ह्या ज्येष्ठ बालरोग तज्ञ असल्याने त्यांच्याकडे सोलापूर, सांगली जिल्ह्यातून वारंवार अशा लहान मुलांच्या उपचारांबाबत विचारणा होत होती. यातूनच त्यांनी जिल्हा प्रशासनाला तसा प्रस्ताव दिला होता.

नवजात शिशू आणि लहान मुले कोरोनाबाधित होत असल्याने डॉक्टर शीतल शहा यांच्या बाल कोविड हॉस्पिटलला जिल्हा प्रशासनाकडून मंजुरी देण्यात आली.

डॉक्टर शीतल शहा यांच्याकडे अत्याधुनिक कॅथ लॅबसह सुसज्ज उपकरणे तसेच प्रशिक्षित असा डॉक्टर, कर्मचारी वर्ग उपलब्ध आहे.

सध्या शीतल शहा हॉस्पिटलमध्ये यांची नवजात बालके हे उपचार घेत आहे. कोरोनाची लक्षणे दिसत असलेले 15 नवजात बालके आणि लहान मुले कोविड सेंटरमध्ये उपचार घेत आहेत.

डॉक्टर शीतल शहा यांनी स्वखर्चाने 15 बेडचे अत्याधुनिक असे दुसर्‍या इमारतीवर बाल कोविड हॉस्पिटल उभारले आहे, यामुळे ग्रामीण भागातील लहान मुलांची सोय झालीय.

  • ब्रेकींग बातम्यांसाठी आमचे टेलिग्राम चॅनेल जॉइन करा http://bit.ly/3qvXmDb
  • अहमदनगर Live24 च्या ब्रेकिंग बातम्या मिळवण्यासाठी फॉलो करा : फेसबुक | ट्विटर|
अहमदनगर लाईव्ह 24