अहमदनगर Live24 टीम, 14 मे 2021 :- कोरोना पाठोपाठ आता म्युकरमायकोसीस या अत्यंत गंभीर आजाराचा सामना करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे.
जिल्ह्यातील पहिला म्युकरमायकोसीसचा रुग्ण जामखेड तालुक्यातील पिंपरखेड येथे आढळला आहे. येथील एक तरुण कोरोनाशी झुंज देऊन बाहेर पडतो न पडतोच त्याला म्युकरमायकोसीसने गाठले.
सध्या त्याच्यावर नगर येथील एका खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. त्याचे दोन्ही डोळे सुजले आहेत. एका डोळ्याची नजर कमी आली आहे.
त्याच्या उपचारासाठी त्याची पत्नी औषधाची शोधाशोध करत आहे. तिचा एकाच वेळी आजारा बरोबरच व परिस्थितीशी संघर्ष सुरू आहे.
हा तरुण एका खाजगी कारखान्यात काम करायचा, मात्र कोरोनामुळे तो कारखाना काही दिवसापासून बंद आहे. त्यामुळे त्याच्या कुटुंबाचा जगण्यासाठीचा संघर्ष सुरुच होता.
त्यातच कोरोनाच्या संसर्गाने त्याला गाठले आणि कुटुंबा समोर नवीन संकट उभे राहिले. कोरोनातुन तो कसाबसा बाहेर पडतो ना पडतो
तोच त्याला परत म्युकरमायकोसीसने त्याला गाठले. उपचारासाठी त्याला नगर येथे खाजगी रुग्णालयात दाखल केले आहे.