अहमदनगर Live24 टीम, 16 फेब्रुवारी 2021:- नगर शहरामध्ये सध्या उड्डाणपुलाचे काम सुरू आहे या उड्डाणपुलाला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव द्यावे अशी मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियान यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.
यावेळी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) चे उत्तर जिल्हा अध्यक्ष सुरेंद्र थोरात, शहर जिल्हाध्यक्ष किरण दाभाडे, नगरसेवक राहुल कांबळे, युवक जिल्हाध्यक्ष अशोक केदारे, भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हाध्यक्ष संजय कांबळे, अमित काळे, अविनाश भोसले, राहुल वैराळ, दीपक गायकवाड,
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया शहर जिल्हाध्यक्ष सुशांत मस्के, युवक जिल्हाध्यक्ष पवन भिंगारदिवे, राष्ट्रवादी सामाजिक न्याय विभागाचे जिल्हाध्यक्ष सोमा शिंदे, टायगर ग्रुप जिल्हा अध्यक्ष बंटी भिंगारदिवे, सोन्याबापु सूर्यवंशी, शिवराम पाटोळे आदींसह विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. सक्कर चौक ते अशोका हॉटेल चौका पर्यंतच्या दान पुलाला डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव देण्यात यावे अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.
यासाठी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले गट) आंबेडकरी संघटना ख्रिश्चन आघाडी यांच्या वतीने मागणी करण्यात आली आहे लवकरात लवकर शासनाने निर्णय घेऊन मागणी पूर्ण करावी ही मागणी पूर्ण न झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया व सर्व आंबेडकर चळवळीच्या वतीने उग्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.