ताज्या बातम्या

माजी राज्यमंत्री म्हणाले, सरकार कोसळणारच होतं, पण चार वर्षांनी

Published by
Ahmednagarlive24 Office

Ahmednagar News :राज्यातील सत्तांतराबद्दल राजकीय मंडळीची वेगवेगळी मते व्यक्त होत आहेत. राहुरीचे आमदार आणि राष्ट्रवादीचे माजी राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे यांचे एक वक्तव्य चर्चेत आले आहे.

‘राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार कोसळणार, अशी आपल्याला शंका होतीच. पण ते चार वर्षांनंतर कोसळेल असे वाटत होते,’ असे वक्तव्य तनपुरे यांनी केले आहे.सत्तांतरानंतर तनपुरे यांनी राहुरी तालुक्यात पहिल्यांदाच कार्यकर्त्यांचा मेळावा घेतला.

त्यामध्ये त्यांनी हे वक्तव्य केले. ते म्हणाले, ‘ही शंका वाटत असल्याने आपण सुरुवातीपासूनच विकास कामांना वेग दिला होता. कोट्यवधी रुपयांची कामे मतदारसंघात आणली. ती पूर्ण व्हायच्या आधीच सरकार कोसळले.

सरकारमध्ये काम करताना आपल्याकडे असलेल्या खात्यांचे शिवसेनेचे कॅबिनेट मंत्री एकनाथ शिंदे आणि उदय सामंत यांनी चांगले सहकार्य केले, मात्र त्या तुलनेत काँग्रेसकडून सहकार्य मिळाले नाही,’ असेही तनपुरे म्हणाले

Ahmednagarlive24 Office