‘ह्या’ फुलांचा सुगंध नेहमीच घेत असालच पण ते पाच आजारांवर आहे गुणकारी

Published by
अहमदनगर लाईव्ह 24

अहमदनगर Live24 टीम, 4 ऑगस्ट 2021 :- ‘ह्या’ फुलांचा सुगंध नेहमीच घेत असालच पण ते पाच आजारांवर आहे गुणकारी फळ, झाड, वेली, साल याचे फायदे आपल्याला माहिती असतात किंवा याची माहिती सहजासहजी उपलब्ध होते परंतु फुलांचे फायदे आपल्याला अतिशय कमी प्रमाणात माहिती असतात.

आज आम्ही सांगणार आहोत पारिजातकाच्या फुलांचे फायदे. पारिजातक हे महाराष्ट्रात सर्वत्र आढळणारे फुल आहे. या फुलांचे अनेक गुणकारी फायदे आहेत.

पारिजातकाच्या फुलांना आपण सर्वांनी बघितलेच असणार. पण कधी आपण या पानांपासून बनविलेल्या चहा प्यायला आहात? किंवा यांचा फुलं, बियाणं किंवा सालींचा वापर आरोग्य आणि सौंदर्यासाठी किती फायदेशीर आहे जर हे आपणास ठाऊक नसल्यास तर जाणून घेऊ या याच्या चमत्कारिक औषधीय गुणधर्माची माहिती –

1) मेंदूला शांतता मिळते- पारिजातकाच्या फुलांमध्ये ताण दूर करण्याची शक्ती असते. जीवनात हे आनंद पसरवते. त्याचा सुगंधामुळे मेंदूला शांतता मिळते.

२) थकवा निवळतो – पारिजातकाची फूले रात्रीच्या वेळी उमलतात आणि सकाळी कोमजतात. अशी आख्यायिका आहे की पारिजातकाला स्पर्शमात्र केल्यानेच अंगातला सर्व थकवा दूर होतो.

३) ताप – कोणत्याही प्रकाराचा ताप असल्यास पारिजातकाच्या पानांचा चहा पिणं खूप फायदेशीर असतं. डेंग्यूच्या तपासून ते मलेरिया किंवा चिकनगुनियापर्यंत कोणत्याही तापाचा नायनाट करण्याची क्षमता यामध्ये असते.

४) सायटिका : दोन कप पाण्यात पारिजातकाचे सुमारे 8 ते 10 पानं मंद आंचेवर अर्ध होईपर्यंत उकळावे. थंड करून सकाळ संध्याकाळ अनोश्या पोटी प्यावं. एका आठवड्यात आपणास फरक जाणवेल.

५) मूळव्याध – पारिजातकाची पानं मूळव्याध किंवा पाईल्स साठी एक चांगले औषध मानले जाते. या साठी पारिजातकाच्या बियाणं घेणं किंवा त्याची पेस्ट बनवून त्या जागीस लावल्याने फायदेशीर असतं.

अहमदनगर लाईव्ह 24